Posts

Showing posts from April 29, 2023

उचकी लागण्याची कारणे व उचकी बंद होण्यासाठी हे करा घरगुती उपाय

Image
  उचकी लागण्याची कारणे :-           उचकी सुरु होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते.  उचकी थांबण्यासाठी हे करा घरगुती उपाय :-  थंड पाणी - उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते.  काही सेकंद श्वास रोखणे - उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा.  मध आणि लिंबू - उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. एक चमचा लिंबू रसात, एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते.   साखर आणि मीठ - उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते.  काळे मिरे - तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तो...

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपचार

Image
  डोळ्यातून घाण येण्याची कारणे :-   झोपून उठल्यामुळे  डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळे आल्यामुळे ( Conjunctivitis )  एलर्जीमुळे  डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे कॉर्नियामध्ये अल्सर झाल्याने डोळ्यातून घाण येत असते.  डोळ्यातून घाण येणे यावरील घरगुती उपाय :-   डोळ्यातून घाण येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.  डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्या हातानी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.  सकाळी उठल्यावर डोळ्यात घाण जमा होऊन डोळे चिकटले असल्यास पाण्याने डोळे धुवावेत.  डोळ्यातून घाण येणे यावर वरील उपाय उपयुक्त ठरतात.   

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय

Image
  त्वचा कोरडी पडण्याची कारणे :-   हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील करणेही जबाबदार ठरतात.  पाणी कमी पिण्याची सवय  जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे  केमिकल्स युक्त साबणाचा अतिवापर  सोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळे त्वचा कोरडी पडत असते.  त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय :-   खोबरेल तेल :- कोरड्या त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.  जोजोबा तेल :- कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.  मध :- कोरड्या त्वचेवर मध लावण्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एकवेळा हा उपाय आपण करू शकता.

डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय

Image
  डोळे खोल जाणे -  काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात. तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते.   डोळे खोल जाण्याची कारणे :-           डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची कमतरता, डिहाड्रेशन, अपुरी झोप, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग यासारखी कारणे यासाठी जबाबदार असतात.  डोळे आत जाणे यावरील घरगुती उपाय :-   संतुलित व पुरेसा आहार घ्यावा.  आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुखामेवा, दुध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे याचा समावेश असावा.  दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.  जागरण करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.  रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.  डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर थोडावेळ ठेवावेत.  मानसिक ताण घेऊ नये.  चहा...

उन्हाळ्याच्या दिवसात ही थंडपेये व सरबते प्यावीत

Image
  उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे ?  उन्हाळा सुरु झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रीजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंड्पेयाची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतात.  उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये व सरबते :-   कोकम सरबत :-  कोकम सरबत इतर कोणत्याही कृत्रिम कोल्ड्रिंक्सपेक्षा चविष्ट असून याचे आरोग्यासाठीचे फायदे अनेक आहेत. कोकम सरबत पिल्याने पित्ताचे खडे असणे, अंगावर पित्त उटणे, पित्तामुळे डोके दुखणे यासारखे अनेक पित्तविकार दूर होण्यास मदत होते.  कोकममुळे अंगात शीतलता वाढून जळजळ, दाह कमी होतो. लघवीस जळजळट असल्यास किंवा उन्हाळे लागण्याचा त्रास असल्यास कोकम सरबत त्यावर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकम सरबत जरूर प्यावे. या सरबतासाठी लागणारे रातांबे कोकाणाशिवाय मिळत नाही. पण काळजी करू नका कारण, आजकाल ब...

सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे करा घरगुती उपाय -

Image
  सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. सर्दी लवकर जात नाही त्यामुळे या त्रासामुळे वैताग येत असतो, यासाठी खाली सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळ करण्यासाठी घरगुती उपाय दिलेले आहेत. सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय :-   लिंबू रस आणि मध:-  चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण रोज सकाळी प्यावे. यामुळे चोन्द्लेले नाक मोकळ होण्यास मदत होते.  आले :-  आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकतो.   पुदिना :-  गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.   कांदा :-  कांदा घेऊन बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे नाक मोकळे होईल. त्याचप्रमाणे थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून नाक मोकळे होईल.  गरम पाण्याची अंघोळ :-  नाक चोंदणे समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे...

उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या येण्याची कारणे व त्यावरील उपचार

Image
  घामोळे येण्याची कारणे :-   उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या त्वचेवर घामोळे येतात.  उकाड्यामुळे उन्हाळ्यात अधिक घाम येवू लागतो, अशावेळी जर त्वचेवरील घामाच्या ग्रंथीपासून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात. याला घामोळे येणे असे म्हणतात.  तसेच काहीवेळा आलेला घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काल घाम राहिल्यानेही घामोळे येते.  घामोळ्याचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना अधिक होत असतो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा त्रास कोणालाही होऊ शकतो.  घामोळ्यावरील उपचार :-   घामोळे साधारण आठवड्याभरात आपोआप कमी होतात. त्यामुळे शरीरावर घामोळे आल्यास त्याठिकाणी खाजवून जखम करू नये. यासाठी घामोल्याच्या ठिकाणी पावडर वापरू शकता.  यामुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी होते.  घामामुळे होणाऱ्या बॅॅॅॅॅक्टेरियाही कमी होतात.  याशिवाय अधिक त्रास होत असल्यास आपले डॉक्टर, त्वचेवर लावण्यासाठी कॅॅलेमाईन लोशन देऊ शकतात. त्यामुलेझी घामोल्याचा त्रास लवकर कमी होईल.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्य...

किडनी स्टोनवर उपाय

Image
  किडनी स्टोन वर उपाय खालील प्रमाणे आहेत :   किडनीस्टोनचे प्रकार वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनी स्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.  ओवा किडनी स्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.   तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.  द्राक्षे खावीत किडनी स्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडियम क्लोराईड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्राधान्य द्यावे.   

थकवा दूर करण्याचे ८ मार्ग

Image
  थकवा दूर करण्याचे ८ मार्ग पुढीलप्रमाणे :-   सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत.  सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचिड होते. तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो.  पाण्यात थोडेसे मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.  शॉवरखाली अंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे.  जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित असते. व्हिटामिन बी, मॅग्नेशियम, पोटॅॅशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे, भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.   व्यायामामुळे रक्तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो. शरीराला मॉलीश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.  थकवा दूर करण्या...

टोमॅॅटो खाण्याचे फायदे आणि त्यातील औषधी गुण

Image
  आज आपण टोमॅटोचे फायदे व औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅॅटोमुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.  कॅन्सरपासून बचाव :-  टोमॅॅॅटोमध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅॅन्सर पसरवणाऱ्या सेल्सची वाढ होऊ देत नाहीत. जर आपण रोज एक टोमॅॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवानुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात.   रक्ताचे उचित संचार :-  जर आपण रोज एक टोमॅॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारे रक्त योग्यप्रकारे कार्य करते. जर आपण टोमॅॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता, तसेच भाजीमध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारण योग्यप्रकारे चालेल. आपले रक्त अजून लाल गडद होईल.    डोळ्यांसाठी उपयुक्त :-  जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅॅटोचे रोज सेवन करा. आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतील. टोमॅॅटोमध्ये विटामिन A व विटामिन C द...

मधुमेहाच्या पेशंटने ही फळे खाणे टाळले पाहिजेत

Image
  जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण काही फळे खाण्याचे टाळले पाहिजे. जर आपल्या घरात कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला आपण बाजारात मिळणारी काही फळे खाण्यापासून रोखले पाहिजे. मधुमेह हा गंभीर आजार आहे, ज्यात रोगी हळूहळू मृत्युच्या वेढ्यात जातो. या आजराला सायलेंट किलर देखील म्हणतात.   मधुमेहाच्या पेशंटने खालील फळे टाळले पाहिजेत.  केळ :-  केळ्यामध्ये १२ ग्रॅम साखर असते याच प्रमाणे मध्यम आकाराच्या केळ्यात जवळजवळ ३० ग्रॅम साखर आणि carbohydrate असतात. यामुळे आपल्या रक्तातील शुगर चे प्रमाण वाढू शकते आणि मधुमेहाच्या पेशंटला आराम मिळण्याच्या ऐवजी त्रास जास्त वाढेल.  कलिंगड :-  कलिंगड हा इतर फळांच्या तुलनेत जास्त गोड नसतो कारण १०० ग्रॅम कलिंगडामध्ये फक्त ६ ग्रॅम साखर असते. कलिंगडाच्या आकारात फरक असतो. एका कलिंगडामध्ये ५० ग्रॅम साखर असते. कलिंगड जर कमी मात्रेत खाल्ला तर त्याचे नुकसान होत नाही.  आंबा :-  मधुमेहात आंबा खाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. १०० ग्रॅम आंब्यात १४ ग्रॅम साखर असते. एवढेच नाही तर एका आंब्यात ३० ते ५० ग्रॅम साखर असते. म्हणून मधुमेहात ...

रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी

Image
  रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी :-   बीट :-  Iron चे प्रमाण : १०० ग्राम मध्ये २.७२ मिलीग्राम - कोशिंबीर बनवून किंवा पेय बनवून प्यावे.  पालक :-  Iron चे प्रमाण : १०० ग्राम मध्ये ८ मिलीग्राम- भाजी बनवून खावे किंवा पेय बनवून प्यावे.  राजमा :-  Iron चे प्रमाण : १०० ग्राममध्ये ८.२ मिलीग्राम- उकडून भाजी बनवा किंवा कोशिंबीरमध्ये मिसळून खावे.  डार्क चॉकलेट :-  Iron चे प्रमाण: १०० ग्रॅम मध्ये १७ मिलीग्राम- असेच खावे किंवा चॉकलेट शेक बनवून प्यावे.   सुका मेवा :-  Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये ६.१ मिलीग्राम- असेच खावे किंवा दुधासोबत खावे.  मटार :-  Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये २.५ मिलीग्राम- भाजी बनवून खावे किंवा उकडून कोशिंबीर मध्ये मिसळून खावे.  सोयाबीन :-  Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये १५.७ मिलीग्राम- भाजी बनवून खावे किंवा उकडून कोशिंबीर मध्ये मिसळून खावे.  भोपळ्याचे बीज :-  Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये १५ मिलीग्राम असेच खावे.           या ...

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय

Image
  दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खालील उपाय आहेत:-  अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात परंतु दातांकडे दुर्लक्ष करतात. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात आणि दात पिवळे दिसू लागतात. या व्यतिरिक्त खाण्याच्या काही पदार्थांचा जास्त प्रमाणात उपयोग, वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन केल्यास दात पिवळे होऊ शकतात.   तुळस :-           तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत क्षमता आढळून येते. तसेच तुळशीमुळे तोंड आणि दातांच्या आजारांपासून बचाव होतो. तुळशीचे पान वळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये  सळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील.  मीठ :-         मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो.  संत्र्याची साल :-     संत्र्याची साल आणि तुळशीचे पान वळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. ब्रश केल्यानंतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा. संत्रीमधील व्हिटाम...