डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय
डोळे खोल जाणे -
काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात. तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते.
डोळे खोल जाण्याची कारणे :-
डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची कमतरता, डिहाड्रेशन, अपुरी झोप, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग यासारखी कारणे यासाठी जबाबदार असतात.
डोळे आत जाणे यावरील घरगुती उपाय :-
- संतुलित व पुरेसा आहार घ्यावा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुखामेवा, दुध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे याचा समावेश असावा.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
- जागरण करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.
- रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.
- डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर थोडावेळ ठेवावेत.
- मानसिक ताण घेऊ नये.
- चहा, कॉफी वारंंवार पिणे टाळावे.
- स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या व्यसनापासून दूर राहावे. अशी काळजी घेतल्यास डोळे खोल जाणे ही समस्या निश्चित दूर होईल.

Comments
Post a Comment