त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय
त्वचा कोरडी पडण्याची कारणे :-
हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील करणेही जबाबदार ठरतात.
- पाणी कमी पिण्याची सवय
- जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे
- केमिकल्स युक्त साबणाचा अतिवापर
- सोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळे त्वचा कोरडी पडत असते.
त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय :-
- खोबरेल तेल :- कोरड्या त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.
- जोजोबा तेल :- कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.
- मध :- कोरड्या त्वचेवर मध लावण्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एकवेळा हा उपाय आपण करू शकता.

Comments
Post a Comment