Posts

Showing posts from April 12, 2023

चरबीच्या गाठी येणे याची कारणे, लक्षणे व उपचार

Image
 अंगावर चरबीच्या गाठी येणे :-   शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात. या लेखात डॉ. सतीश उपळकर यांनी चरबीच्या गाठी येण्याची कारणे, लक्षणे, उपचार आणि त्यावरील घरगुती उपाय याची माहिती सांगितली आहे.  ह्या चरबीच्या गाठी Bening ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात. चरबीच्या गाठी या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते.  चरबीच्या गाठी का व कशामुळे येतात?  चरबीच्या गाठी नेमक्या कशामुळे येतात याची ठोस कारणे अद्यापही माहित झालेली नाही. ४० ते ६० वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी येण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे हा त्रास होऊ शकतो. याशिवाय Madelung's आजार, काउडन सिंड्रोम, गार्डन सिंड्रोम, एडीपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारामुळे चरबी...

पित्तामुळे डोके दुखत असल्यास हे घरगुती उपाय करा.

Image
  पित्तामुळे डोके दुखणे :- पित्तामुळे अनेकांचे डोके दुखत असते. प्रामुख्याने वारंवार तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ, चहा-कॉफी अतिरेक, अपुरी झोप, तणाव, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास व त्यामुळे डोके दुखू लागते. यासाठी पित्तामुळे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.  पित्तामुळे डोके दुखण्याची करणे :-   वरचेवर तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यांसारखे पदार्थ अधिक खाणे.  चहा, कॉफीचे अतिप्रमाण.  उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा बराच वेळ उपाशी राहणे.   तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान यांसारखी व्यसने.  मानसिक तणाव, राग.  वरचेवर डोके किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेणे.  अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.  अशा विविध कारणांनी पित्त वाढते व त्यामुळे डोके दुखणे, ऍसिडिटी, छातीत जळजळ होणे, अल्सर य...

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

Image
  चिकनगुनिया आजार :- चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात. तसेच चिकनगुनिया आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवस सांधे दुखू शकतात. चिकनगुनिया कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि चिकनगुनिया वरील उपचार याविषयी माहिती या लेखात डॉ. सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.               चिकनगुनिया होण्याची कारणे :- जेव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या जातीच्या डासाची मादी एखाद्या व्यक्तीस चावते त्यावेळी त्या डासातील विषाणू हे त्या व्यक्तीच्या शरीरात पसरतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अशाप्रकारे चिकनगुनियाची लागण होत असते. तसेच काहीवेळा चिकनगुनिया संक्रमित रक्तातून देखील याची लागण होऊ शकते.  चिकनगुनिया संसर्गजन्य आहे का?  चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांद्वारे मनुष्यांना होत असतो. हा आजार चिकनगुनियाच्या विषाणूने (CHIKV) बाधित असणाऱ्या डासांमार्फत होत असतो. चिकनगुनिया हा आजार एका व्यक्तीकडून...