उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या येण्याची कारणे व त्यावरील उपचार
घामोळे येण्याची कारणे :-
- उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या त्वचेवर घामोळे येतात.
- उकाड्यामुळे उन्हाळ्यात अधिक घाम येवू लागतो, अशावेळी जर त्वचेवरील घामाच्या ग्रंथीपासून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात. याला घामोळे येणे असे म्हणतात.
- तसेच काहीवेळा आलेला घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काल घाम राहिल्यानेही घामोळे येते.
- घामोळ्याचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना अधिक होत असतो.
- लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा त्रास कोणालाही होऊ शकतो.
- घामोळे साधारण आठवड्याभरात आपोआप कमी होतात. त्यामुळे शरीरावर घामोळे आल्यास त्याठिकाणी खाजवून जखम करू नये. यासाठी घामोल्याच्या ठिकाणी पावडर वापरू शकता.
- यामुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी होते.
- घामामुळे होणाऱ्या बॅॅॅॅॅक्टेरियाही कमी होतात.
- याशिवाय अधिक त्रास होत असल्यास आपले डॉक्टर, त्वचेवर लावण्यासाठी कॅॅलेमाईन लोशन देऊ शकतात. त्यामुलेझी घामोल्याचा त्रास लवकर कमी होईल.
- उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यास थंड पाण्यात भिजवलेल्या टाॅवेलने अंग पुसून घ्यावे.
- जंतुनाशक साबणाने अंघोळ करावी. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- उन्हाळ्यात घाम शोषनारी सुती कपडे घालावीत.
- घामोळ्याच्या ठिकाणी कडुलिंबाची पाने बारीक वाटून लेप लावल्यास आराम मिळतो.
- घामोळ्यावर मुलतानी माती, चंदन पावडर किंवा कोरपडीचा गर लावणेही उपयोगी असते.

Comments
Post a Comment