Posts

Showing posts from April 14, 2023

सुदृढ शरीरासाठी आहार...

Image
  सुदृढ शरीरासाठी निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार गरजेचा आहे. या टिप्स वाचून तुम्हाला संतुलित आहार कसा घ्यायचा याची कल्पना येईल.  आहारातून काब्स पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा चांगले कार्बोहायड्रेट निवडा. काब्स आपल्याला ऊर्जेसाठी अत्यावश्यक आहेत. म्हणूनच रोजच्या आहार प्रक्रिया न केलेली धान्ये सामाविष्ट करा.  रोजच्या आहारात प्रथिने घेतलीच पाहिजे. डाळी, कडधान्ये, मासे, पोल्ट्री, नट्स आणि बीन्स हे प्रोटीन्सचे सर्वोत्तम पर्याय आहेत.  हेल्दी फॅॅॅॅट्स असलेले पदार्थ निवडा, सॅॅच्युरेटेड फॅॅट जास्त असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि ट्रान्स फॅॅट असलेले पदार्थ टाळा. नट्स आणि मासे हे हेल्दी फॅॅॅॅट्सचे सर्वात आरोग्यदायी स्त्रोत आहेत. आहारात फायबरचा समावेश करा. तृणधान्ये, ताजी फळे व भाज्या असा भरपूर फायबरयुक्त आहार निवडा.  भाज्या व फळांतून आपल्याला व्हिटॅॅमिन्स, मिनरल्स आणि अँँटिऑक्सिडंंट्स देखील मिळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे.  शरीराचे कार्य सुरळीत चालावे व हाडे भक्कम राहावीत यासाठी कॅल्शियम असलेले पदार्थ जसे की दुध, खारीक, नाचणी यांचा आहारात समावे...

निरोगी शरीरासाठी महत्वाची योगासने...

Image
  दिवसातून केवळ अर्धा तास योगासने करून तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त आणि लवचिक ठेवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. पुढील योगासने केल्यास तुमचा व्यायाम तर होईलच शिवाय ताणतणाव कमी होण्यास देखील मदत मिळते. पावर योगा केल्याचेही अनेक फायदे आहेत.    उत्तानासन योगाने शरीर राहील सुदृढ :                                                                हे आसन सरळ उभे राहून केले जाते. हे कळण्यासाठी सरळ उभे राहा. हळूहळू कंंबर वाकवून श्वास घेताना आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या आसनात राहा व परत सामान्य स्थितीत या. आसन करताना गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्या.  सुखासन :             या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायाचे असेल तर या आसनाचा दररोज सराव करा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर मांडी घाल...

दररोज लागणाऱ्या हेल्थ टिप्स

Image
  निरोगी जीवनासाठी दैनंदिन दिनचर्येत काही छोटे मोठे बदल केलेत तर तुम्हाला निरोगी जीवनशैली जगता येऊ शकते.या सोप्या टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा.  दिवसाची सुरुवात एक ग्लास लिंबू पाण्याने करा. अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात घाला आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्यासाठी हे प्या. लिंबाचा रस तुमच्या शरीरातील आम्लतेची पातळी कमी करतो, ज्यामुळे, फंगल इन्फेक्शन आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या रोगांपासून तुमचे संरक्षण होते.  दररोज सकाळी व्यायाम करा. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते. दररोज फक्त २० किंवा ३० मिनिटे व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  दररोज सकाळी चांगला पौष्टिक नाष्टा करा. सकाळच्या न्याहारीत प्रथिने, स्लो-रिलीज कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश करा. हायड्रेेटेड रहा. शरीरात निर्जलीकरण झाल्यामुळे त्रास होतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते. दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लासेस पाणी प्या.  पौष्टिक जेवण करा. दुपारचे जेवण देखील नाश्त्याप्रमाणे संतुलित असले पाहिजे. कधीही जेवण स्किप करू ...

सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी उपाय....

Image
           डोळे हा अत्यंत महत्वाचा परंतु नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी पुढील उपाय आहेत. डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगी व संतुलीत आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर किंवा फळे आणि भाज्यांंचा समावेश करा. विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा-३ फॅॅॅटी एसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्याने डोळ्यांना फायदा होतो.  जास्त वजन किंंवा लट्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटीनोपॅॅथी किंंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा.  व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.  तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UV-A आणि UV-B दोन्ही रेडिएशन ९९ ते १०० % रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा....

निरोगी हृदयासाठी हेल्थ टिप्स....

Image
  संतुलित आहार, नियमितपणे व्यायाम करणे व तणावाचे व्यवस्थापन करणे अशा निरोगी जीवनशैलीमुळे हृदय निरोगी राहते. हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.  हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. कोरोनरी हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे.  सक्रीय जीवनशैलीचा अवलंब करा. सक्रीय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बुस्टर आणि स्ट्रेेस बस्टर आहे. दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम करणे. तुम्हाला जेथे शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा.  तुमचे वजन व्यवस्थापित करा. जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या, चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार घ्या.  भरपूर फायबर खा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी दिवसातून किमान ३० ग्रॅम फायबर खा.  जास्त प्रमाणात सॅॅच्युुरेटेड फॅॅट असलेले पदार्थ खाल्याने तुमच्या रक्तात...