उचकी लागण्याची कारणे व उचकी बंद होण्यासाठी हे करा घरगुती उपाय


 

उचकी लागण्याची कारणे :-
 

        उचकी सुरु होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते. 

उचकी थांबण्यासाठी हे करा घरगुती उपाय :- 

  • थंड पाणी - उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते. 
  • काही सेकंद श्वास रोखणे - उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. 
  • मध आणि लिंबू - उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. एक चमचा लिंबू रसात, एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते.
     
  • साखर आणि मीठ - उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते. 
  • काळे मिरे - तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात धरून चावत रहावी. त्यावर एक ते दोन घोट पाणी पिण्यामुळे उचक्या थांबतात. हा आयुर्वेदिक उपाय उच्कीवर उपयुक्त आहे. 
  • उलटे अंक मोजा - १०० ते १ असे उलटे अंक मोजल्याने उचकी थांबण्यास मदत होते. तसेच उचकी लागलेल्या व्यक्तीला अचानक घाबरविल्यासही उचकी थांबते.    

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स