अर्ध डोकेदुखी वर उपाय
अर्ध डोकेदुखी वर उपाय - अर्ध डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. अर्ध डोकेदुखी मध्ये तुम्हाला तुमच्या डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूंना दुखायला लागते. अर्ध डोकेदुखीचा त्रास हळूहळू किंवा अचानक होतो. याची लक्षणे तीक्ष्ण किंवा हलकी आणि धडधडणारी वाटू शकते. कधीकधी वेदना आपल्या मानेवर, दात किंवा डोळ्यांच्या मागे पसरते. अर्ध डोकेदुखीचा त्रास सहसा काही तासांत कमी होतो आणि काळजीचे कारण नसते. परंतु डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना किंवा दुखणे जे दूर होत नाही हे इतर गंभीर गोष्टींचे लक्षण असू शकते. अर्ध डोकेदुखी ची कारणे उपवास करणे तणाव अपुरी झोप इन्फेक्शन व एलर्जी औषधांचा गैरवापर उच्च रक्तदाब टेन्शन अर्ध डोकेदुखी वर उपाय आराम करा / पुरेसी झोप काढा झोपेचा अभाव आणि जास्त झोप अर्ध डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. प्रत्येक रात्री ७ - ९ तास शांत झोप घेणे तणाव कमी करण्यास आणि अर्ध डोकेदुखी टाळण्यास मदत करू शकते. मसाज मान आणि खांद्याच्या स्नायूंची मालिश केल्याने तणाव कमी होतो आणि अर्ध डोकेदुखीचा त्रास देखील कमी...