उन्हाळ्याच्या दिवसात ही थंडपेये व सरबते प्यावीत


 

उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे ? 

उन्हाळा सुरु झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रीजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंड्पेयाची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतात. 

उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये व सरबते :-
 

  • कोकम सरबत :- 


कोकम सरबत इतर कोणत्याही कृत्रिम कोल्ड्रिंक्सपेक्षा चविष्ट असून याचे आरोग्यासाठीचे फायदे अनेक आहेत. कोकम सरबत पिल्याने पित्ताचे खडे असणे, अंगावर पित्त उटणे, पित्तामुळे डोके दुखणे यासारखे अनेक पित्तविकार दूर होण्यास मदत होते. 

कोकममुळे अंगात शीतलता वाढून जळजळ, दाह कमी होतो. लघवीस जळजळट असल्यास किंवा उन्हाळे लागण्याचा त्रास असल्यास कोकम सरबत त्यावर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकम सरबत जरूर प्यावे. या सरबतासाठी लागणारे रातांबे कोकाणाशिवाय मिळत नाही. पण काळजी करू नका कारण, आजकाल बाजारात रेडियम कोकम ज्यूस मिळते, त्यात फक्त पाणी घालायचे व कोकम सरबत करून प्यायचे. 

  • शहाळ्याचे पाणी :- 

सोडियम आणि पोटॅॅशिअम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरते. उन्हाळा सुरु झाला की अंगाची लाहीलाही होऊन त्यामुळे येणारा थकवा आपल्याला दमवून टाकतो. अशावेळी उन्हाळ्यातील डिहायड्रेेशनवर नारळपाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. याशिवाय उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यास यामुळे मदत होते.

 

  • उसाचा रस :- 



ऊस हा थंड गुणाचा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस पिणे उपयुक्त असते. उस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो. त्यामुळे उसाचा रस पिण्यामुळे लाघवी साफ होते. लघवीच्या वेळी आग होणे, जळजळने, मुतखडा यासारख्या आजारात उपयुक्त ठरते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ न घातलेला उसाचा रस जरूर प्यावा. 
  • लिंबू सरबत :- 


लिंबू सरबतामुळे युरीन साफ होते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. याशिवाय लिंबू रसातून आपल्या शरीराला क जीवनसत्व मिळते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच यात अनेक अँँटी ऑक्सिंडट गुणही असतात. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबूपाणी किंवा लिंबू सरबत पिणे कधीही चांगले असते.  
  • आवळा सरबत :- 




उन्हाळ्यात आवर्जून पिण्यासारखे आणखी एक आरोग्यदायी पेय आहे ते म्हणजे आवळा सरबत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन C असते. ताजी आवळे उपलब्ध नसल्यास बाजारातून आपण आवळा ज्यूस आणि त्यात पाणी घालून कधीही सरबत करून पिऊ शकतो. 






Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स