सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे करा घरगुती उपाय -
सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. सर्दी लवकर जात नाही त्यामुळे या त्रासामुळे वैताग येत असतो, यासाठी खाली सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळ करण्यासाठी घरगुती उपाय दिलेले आहेत.
सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय :-
- लिंबू रस आणि मध:-
![]() |
चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण रोज सकाळी प्यावे. यामुळे चोन्द्लेले नाक मोकळ होण्यास मदत होते.
- आले :-
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकतो.
- पुदिना :-
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.
- कांदा :-
कांदा घेऊन बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे नाक मोकळे होईल. त्याचप्रमाणे थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून नाक मोकळे होईल.
- गरम पाण्याची अंघोळ :-
नाक चोंदणे समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत होते व फ्रेशही वाटते.






Comments
Post a Comment