दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय


 

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खालील उपाय आहेत:- अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात परंतु दातांकडे दुर्लक्ष करतात. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात आणि दात पिवळे दिसू लागतात. या व्यतिरिक्त खाण्याच्या काही पदार्थांचा जास्त प्रमाणात उपयोग, वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन केल्यास दात पिवळे होऊ शकतात.
 

  • तुळस :- 
         तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत क्षमता आढळून येते. तसेच तुळशीमुळे तोंड आणि दातांच्या आजारांपासून बचाव होतो. तुळशीचे पान वळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये  सळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील. 
  • मीठ :- 

      मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो. 
  • संत्र्याची साल :-




    संत्र्याची साल आणि तुळशीचे पान वळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. ब्रश केल्यानंतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा. संत्रीमधील व्हिटामिन सी आणि कॅल्शियममुळे दात मोत्यासारखे पांढरे दिसतील.
 

  • गाजर :- 

     दररोज गाजर खाल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्यास यामधील रेशे दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. 

  • लिंबू :- 
      लिंबाचा उपाय प्राचीन काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. लिंबामध्ये दात पांढरे करणारे आणि बॅॅॅॅॅॅॅॅक्टेरिया नष्ट करणारे गण आढळून येतात. हे एक नैसर्गिक अँँटीबॅॅॅॅॅॅॅॅक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक आहे. दररोज लिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे कोणतेही आजार होत नाहीत. 
  • बेकिंग सोडा :- 

   बेकिंग सोडा पिवळे दात पांढरे करण्याचा चांगला घरगुती उपाय आहे. ब्रश केल्यानंतर थोडासा बेकिंग सोडा घेऊन दात साफ करा. यामुळे दातांवर जमा झालेला पिवळा थर हळूहळू कमी होईल. बेकिंग सोडा आणि थोडेसे मीठ टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील. 

  • स्ट्राॅॅबेरी :- 

    स्ट्राॅॅबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे. स्ट्राॅॅबेरीमध्ये आढळून येणारे मॅलिक एसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्राॅॅबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा.

  • केळ:-
 

       केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा. दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल. 





Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स