थकवा दूर करण्याचे ८ मार्ग


 

थकवा दूर करण्याचे ८ मार्ग पुढीलप्रमाणे :-
 

  1. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. 
  2. सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचिड होते. तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो. 
  3. पाण्यात थोडेसे मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते. 
  4. शॉवरखाली अंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे. 
  5. जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित असते. व्हिटामिन बी, मॅग्नेशियम, पोटॅॅशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे, भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
     
  6. व्यायामामुळे रक्तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
  7. शरीराला मॉलीश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो. 
  8. थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची उर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा. दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा. 
  9. रंगाचा सुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल. पिवळा, डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते. 
  10. थकवा जास्त जाणवत असेल तर वर दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगात आणा.  


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स