किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन म्हणजे काय? लक्षणे तपासणी किडनीमध्ये इन्फेक्शन किडनी स्टोन आणि होमिओपॅथी आजार व औषधोपचार किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो. लक्षणे किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच जेलीयुक्त घटक पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते. तपासणी एखाद्या आजाराचे निदान कळण्यासाठी तपासण्या गरजेच्या असतात. आर.एफ.टी. ही तपासणी किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताद्वारे केली जाते. मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्या...