Posts

Showing posts from April 18, 2023

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स....

Image
  आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त आहोत की, आपण आपल्या आरोग्याची मुळीच काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे आपलयाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यास असमर्थ होतो.ज्यामुळे आपल्याला बऱ्याच रोग आणि त्रासांना सामोरे जावे लागते.  निरोगी मन फक्त निरोगी शरीरातच असते...ही म्हण जुनी आहे, पण ती अगदी खरी आहे. तसे, जर आपण आपल्या दैनदिन जीवनात काही गोष्टींंचा समावेश केला आणि काही नियमांचे पालन केले, तर आपण स्वतःस अधिक सहजपणे फिट ठेवू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी टिप्स :-  १) खूप पाणी प्या.   एक म्हण आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, ही योग्य म्हण आहे, म्हणून आपण सर्वात आधी या विषयाची सुरुवात पाण्यापासून करू. दिवसातील जास्तीत जास्त पाणी पिणे हे एका फिटनेस माणसाचे सर्वात मोठे रहस्य आहे.   कारण दिवसात आपण जे काही काम करतो, त्यात आपण आपली बरीच उर्जा खर्च करतो,पाण्यामुळे काही प्रमाणात आपण ती भरून काढू शकतो, म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला २ ते ३ ग्लास पाणी पिण्या...

केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ

Image
   केसांना तेल लावण्यापूर्वी ते किंचित गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावा.  तेलात बोटंं घालून, हाताने केसांचे भाग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा. केसांवर तेल थापून ठेवू नका. गरजेपुरते तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा. जास्त तेल म्हणजे ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लागेल.  तेल लावताना केस तळव्यांंवर घेऊन चोळू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. टाळूवर १०-१५ मिनिटे मसाज करावा, यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.  रात्रभर केसांवर तेल राहू द्या. जास्त वेळ तेल केसांवर राहणे चांगले असले तरीही २४ तासांपेक्षा अधिक काळ  ठेवू नये. त्यामुळे घाण जमून केस दुबळे होण्याची शक्यता असते.  गरम टॉवेलने केसांना वाफ देणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे केसांमध्ये तेलाचे योग्यरित्या शोषण होते. मात्र १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉवेल केसांवर ठेवू नये.  किमान आठवड्यातून एकदा केसांना तेल अवश्य लावावे.  ज्ञानतंतूचे बल, इच्छापूर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते. दृष्टी सुधारते, गाल आणि डोळे यांस बलप्राप्ती होते.  शिरोरोग आणि मज्जारोग यांवर उपयुक्त आहे. डोक...

कानात बाहेरील कोणतीही वस्तू गेल्यास त्यावरील उपाय

Image
   कानात किडा जाणे :-                          - कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो. पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो.                  - कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर ह किडा काढता येतो. पण तो ताबडतोब काढून टाकणे आवश्यक असते. साधा छोटा चिमटा वापरून किड्याचा भाग पकडून संपूर्ण किडा बाहेर काढता येईल. नंतर कान कोमट पाण्याने धुवून टाकणे चांगले. हे न जमल्यास कंच्या डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. कानात बी किंवा खडा जाणे :-                    - लहान मुले कानात बी, खडा, पेन्सिल, इत्यादी घालतात. टोकदार किंवा खरखरीत पदार्थ घातला असेल तर कानातील पडद्याला इजा होण्याचा संभव असतो. लहान मुले नीट माहिती सांगू शकत नाहीत. ...

ओठांची निगा कशी राखावी

Image
  ओठांचा आखीव, रेखीव आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या मधल्या बाजूला भडक रंग लावला आणि कडांना हलक्या रंगाने लिपस्टिक लावावे. ओठ दाताने कुरतडण्याच्या सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, ओठ राठ दिसतात. यासाठी ग्लाॅॅसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर करता येईल. हे पारदर्शी रंगाचेही असते. सकाळी, रात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईल. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.  चेहरा आणि ओठ अतिशय लहान असल्यास लिपस्टिक ओठांच्या कडांच्या पलीकडे जाऊन थोडी बाहेरपर्यंत लावावी, ओठांवरील लिपस्टिक काढण्यासाठी नेहमी क्लिंंझींग मिल्कचा वापर करावा. लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडीशी पावडर लावावी, त्यानंतर लिपस्टिक लावावी, ह्यामुळे लिपस्टिक बराच वेळ टिकण्यास मदत होईल व ओठ सुंदर दिसतील.  लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर लावून बेस तयार करून नंतर त्यावर लिपस्टिक लावल्यासही लिपस्टिक बर...

दातदुखी यावर घरगुती उपाय...

Image
  दुखणाऱ्या दाताच्या रेषेत गालावरून बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणंं थोडं बधिर होतंं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि सूज आली असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो. पण जर किडीमुळे दातदुखी झाली नसेल तर वरील उपाय त्रासदायक ठरू शकतो. अशा वेळी गरम पाण्याची बाटली/पिशवी वापरावी. दातांना कीड असेल तर टूथपिक ने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाच्या बोळा भरून ठेवावी.  १ चमचा मीठ अर्ध्या लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळण्या करून तोंड स्वच्छ ठेवावे.  

डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी कोरफडचे नैसर्गिक उपाय

Image
  डोक्यातील कोंडा, डोक्याच्या त्वचेला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे केसांचे नुकसान होऊन केस कमजोर होऊन गळायला लागतात. जर डेंड्रफचा वेळेत उपचार केला नाही, तर केस गळण्याची समस्या गंभीर होऊ शकते. कोंडा होण्याचे कारण, डोक्यात केसांच्या मुळांवर मृत त्वचेचा साठाा आहे. ही मृत त्वचा एखाद्या कवचच्या स्वरुपात साठवून राहते आणि त्याच्यामुळे डोक्याच्या त्वचेला हानी होते. कारण ही डेड स्कीन डोक्याच्या त्वचेपासून निघणाऱ्या तेलात मिसळते आणि मग वळून त्वचेवरून सुटी होऊन खाली पडते.  डोक्याच्या कोंंड्यापासून अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, जस की कोंड्यामुळे खाज सुटणे, शरीराच्या त्वचेवर पुरळ किवा मुरुम येणे, मानेवर खाज होणे आणि डोळे लाल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कोरफड (एलोवेरा) जेलचे फायदे, डोक्यातील कोंड्यासाठी उपाय : एलोवेराचे ताजे जेल डेंड्र्फच्या घरच्या उपायांसाठी एक वरदान आहे (डेंंड्र्फचा घरगुती इलाज). जर आपणाकडे कोरफड (एलोवेरा) ही वनस्पती घरी असल्यास आपण सहजपणे एलोवेराचे ताजे जेल मिळवू शकता. यासाठी कोरफडची पानंं तोडून चमच्याने त्याचा रस काढावा व हाताने मिक्स करून डोक्याच्...