Posts

Showing posts from April 22, 2023

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपचार

Image
  जर आपण केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर या समस्येवर काही उपाय जाणून घेऊया.  आवळा :-  आवळा हा फळ जरी छोटा असला तरी खूप गुणकारी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आवळ्याचा नियमितपणे वापर केल्याने त्याचा आपल्या केसांसाठी देखील फायदा होतो. आवळ्याचा वापर फक्त आहारात न करता आवळा मेहंदीत मिळवून केसांमध्ये लावा.तसेच आवळा कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नारळाचे तेल थोडे गरम करून त्यात हे तुकडे टाका व केसामध्ये लावा आपल्याला फायदा होईल. black tea (काळा चहा) व coffee :-  जर आपल्याला आपले केस काळे करायचे असतील तर black tea व cofee च्या अरक णे केस धुवा, असे आठवड्यातून तीन वेळा करा. एलोवेरा (कोरफड):-  जर आपण पांढरे केस व केस गळती पासून त्रस्त असाल तर केसात एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस मिळवून केसांमध्ये लावा.  तूप :- जर आपले केस सफेद होत असतील तर केसांची तुपाने मालिश करा. आपल्या सफेद केसांची समस्या दूर होईल.  दही :- जर आपल्याला केस प्राकृतिक रूपाने काळे करायचे असतील तर दहीचा वापर करा. दहीमध्ये मेहंदी बरोबर मात्रेत मिळवा आणि हे मिश्रण केसांम...

घशात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही, तर हे उपाय करा..

Image
  गुदमरत असलेली व्यक्ती खोकत असेल तर त्याला खोकू द्यावे. कारण त्यामुळे घशात अडकलेली वस्तू बाहेर फेकली जाऊ शकते. जर खोकून अडकलेली वस्तू बाहेर फेकली गेली नाही तर रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.  प्रथोमपचार :-  गुदमरत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहून त्यांचे हात त्याच्या छातीच्या बाजूने पुढे आणा.  हात एकात एक गुंतवा व अंगठ्याच्या मदतीने रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीवर दाब द्या. हातातील जोर वाढवून तुमचे हात बाहेरच्या बाजूला ओढा व वरच्या जबड्यावर आत बाहेर असा भर द्या ही पद्धत तोपर्यंत वापरा जोपर्यंत रुग्णाच्या घशात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही. या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही असे वाटल्यास रुग्णाला त्वरित डॉक्टरकडे न्यावे. 

तोंड येणे यावर घरगुती उपाय...

Image
  आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.  उपाय :-  १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावे. ते सकाळी बारीक चावून खावे.  सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.   जखमांना ज्येष्ठमध किवा शुद्ध गेरूची पूड लावावी.  अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दुध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.  रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.  साधे उकडलेले जेवण घ्यावे व जागरण टाळावे.  

उंबर वृक्ष

Image
  उंबराचे झाड खूप मोठे असते. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फुट उंच असते. उंबराच्या झाडाला फुल कधी येतात हे कधीच दिसत नाहीत, असा आदिम समाजात समज आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यानंतर लाल रंगाची होतात. फळे गोल चिकूच्या आकाराची असते. उंबराची फळ माणसांसोबत जनावरेही आनंदाने खात असतात. या फळाच्या आत अळी सारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पूर्ण खाताना काहीही वाटत नाही. फळाचे मधून दोन तुकडे केल्यास एक तुकडा दुसऱ्या तुकड्यासोबत घासून खाल्ले तर चव अधिक चांगली येते. उंबराच्या झाडावर पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. उंबर हे त्यांचे खाद्य देखील असते. माकडे या झाडावर बसून निवांत उंबराची फळे खात असतात. गुरे-ढोरे-बकरे उंबराच्या झाडाखाली बसून पिकलेले फळे खाण्यासाठी ते पडण्याची वाट पाहत असतात. औषधी म्हणून या झाडाचा खूप मोठा उपयोग आदिम समजात होतो. जिथे उंबराचे झाड असते. तिथे पाण्याचा स्त्रोत हमखास असतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.   या झाडाची पाने सीताफळाच्या पानासारखे असून हे ...

पित्त होण्याची कारणे , पित्ताची लक्षणे, त्यामुळे होणारे त्रास / आजार आणि त्यावरील घरगुती उपाय

Image
  पित्त होण्याची कारणे / असमतोलाची लक्षणे :  पित्त दोषाची शारीरिक लक्षणे -  भूक आणि / तहान वाढणे. संसर्ग  केस पांढरे होणे / गळणे  भोवळ येणे आणि अर्धशिशी  अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे. श्वासात आणि शरीराची दुर्गंधी  घश्याला कोरड पडणे. जेवणाची वेळ टाळण्यास मळमळ वाटणे  निद्रानाश  स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे  वेदनादायी मासिक पाळीचा त्रास  पित्त दोषाने होणारे वागणुकीतील बदल (लक्षणे) -  उताविळपणा  निराशा  अहंकारात वाढ  अति ध्येयवादी  संताप मत्सर  तार्किक  अस्थिर वर्तन  परिपूर्णतेचा सोस  पित्तामुळे होणारे आजार :-  पित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.  छातीत जळजळ  उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग  आम्लदाह, पोटातील व्रण  ताप  रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात  मूत्रपिंडाचा संसर्ग  थायराॅइड ग्रंथीचे विकार  कावीळ  सांधेदुखी  अतिसार  जुनाट थकव्याची लक्षणे...

पावसाळ्यात डासांमुळे होणारे संसर्ग- लक्षणे व उपचार

Image
World Mosquito Day :- डासांमुळे होणाऱ्या संसर्गाचा उपद्रव संपूर्ण वर्षभर होत असला तरी पावसाळ्यात याचे प्रमाण खूप वाढते. भारतात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासीस, व्हायरल एंंसिफिलाइटिस हे डासांमुळे होणारे, सर्वाधिक आढळून येणारे संसर्ग आहेत.  मोठ्या प्रमाणावर पसरणारे साथीचे रोग आणि स्थानिक पातळीवरील आजार या आपल्या देशासाठी काही नवीन समस्या नाहीत. भारतात डासांच्या तब्बल ४०० प्रजाती आढळून येतात, त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये संसर्ग पसरवू शकतील असे जीव असतात आणि त्यामुळे अशा संसर्गाचा उद्रेक वारंंवार होत असतो.  डासांमुळे आता कीटकनाशकांचा काहीही परिणाम होत नसल्याने आणि त्यांच्या गुणधर्मांमध्ये झालेल्या बदलांंमुळे, हल्लीच्या काळात असे आजार पुन्हा होऊ लागले आहेत. जे आधी जवळपास नष्ट झाले होते. डासांमुळे होणारे, सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे आजार पुढीलप्रमाणे आहेत. मलेरिया :-         मलेरिया प्रोटोझोआचे चार प्रकार आहेत परंतु व्हायव्हॅॅक्स आणि फॉल्सीपेरम मलेरियामध्ये सेरेब्रल ताप आणि शारीरिक प्रणालीमध्ये गुंतागुत निर्माण होत असल्याने हा गंभ...