पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय ‘हे केस असेच उन्हात नाही पांढरे झाले’, असं नेहमीच थोरामोठ्यांकडून बोललेलं तुम्ही ऐकलं आहे. पूर्वीच्या काळी ही गोष्ट नक्कीच योग्य होती, कारण तेव्हा वाढतं वय आणि अनुभवानुसारच केस पांढरे होत होते. मात्र आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केवळ वयामुळं नाही तर तणाव आणि प्रदूषणामुळे लोकांचे केस लवकर काळे व्हायला लागले आहेत. सध्या उन्हातच केस पांढरे होत आहेत असं म्हटलं तर नक्कीच अति नाही होणार. मात्र असं असतानाही काळे आणि घट्ट केसच सर्वांना आवडत असतात. डोक्यावर एकही पांढरा केस दिसला तरीही पूर्ण दिवस चिंता करण्यात जातो की, केस पांढरे व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपण अगदी मेंदीपासून डाय आणि हेअरकलर हा सगळ्याच गोष्टी हाताळून पाहतो. पण केस काळे व्हायला लागल्यावर तुम्हाला चिंता करायची खरंच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला केस काळे करण्याचे असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही आतापर्यंत करून पाहिले नसतील. तसंच याबरोबरच डाय केल्यामुळे काय नुकसान होतं आणि केसांना काळं राखून ठेवण्यासाठी कोणतं खाणं आवश्यक आहे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....