उचकी लागण्याची कारणे व उचकी बंद होण्यासाठी हे करा घरगुती उपाय
उचकी लागण्याची कारणे :- उचकी सुरु होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते. उचकी थांबण्यासाठी हे करा घरगुती उपाय :- थंड पाणी - उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते. काही सेकंद श्वास रोखणे - उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. मध आणि लिंबू - उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. एक चमचा लिंबू रसात, एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते. साखर आणि मीठ - उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते. काळे मिरे - तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तो...