Posts

उचकी लागण्याची कारणे व उचकी बंद होण्यासाठी हे करा घरगुती उपाय

Image
  उचकी लागण्याची कारणे :-           उचकी सुरु होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते.  उचकी थांबण्यासाठी हे करा घरगुती उपाय :-  थंड पाणी - उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते.  काही सेकंद श्वास रोखणे - उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा.  मध आणि लिंबू - उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. एक चमचा लिंबू रसात, एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते.   साखर आणि मीठ - उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते.  काळे मिरे - तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तो...

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपचार

Image
  डोळ्यातून घाण येण्याची कारणे :-   झोपून उठल्यामुळे  डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळे आल्यामुळे ( Conjunctivitis )  एलर्जीमुळे  डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे कॉर्नियामध्ये अल्सर झाल्याने डोळ्यातून घाण येत असते.  डोळ्यातून घाण येणे यावरील घरगुती उपाय :-   डोळ्यातून घाण येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.  डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्या हातानी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.  सकाळी उठल्यावर डोळ्यात घाण जमा होऊन डोळे चिकटले असल्यास पाण्याने डोळे धुवावेत.  डोळ्यातून घाण येणे यावर वरील उपाय उपयुक्त ठरतात.   

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय

Image
  त्वचा कोरडी पडण्याची कारणे :-   हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील करणेही जबाबदार ठरतात.  पाणी कमी पिण्याची सवय  जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे  केमिकल्स युक्त साबणाचा अतिवापर  सोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळे त्वचा कोरडी पडत असते.  त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय :-   खोबरेल तेल :- कोरड्या त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.  जोजोबा तेल :- कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.  मध :- कोरड्या त्वचेवर मध लावण्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एकवेळा हा उपाय आपण करू शकता.

डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय

Image
  डोळे खोल जाणे -  काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात. तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते.   डोळे खोल जाण्याची कारणे :-           डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची कमतरता, डिहाड्रेशन, अपुरी झोप, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग यासारखी कारणे यासाठी जबाबदार असतात.  डोळे आत जाणे यावरील घरगुती उपाय :-   संतुलित व पुरेसा आहार घ्यावा.  आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुखामेवा, दुध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे याचा समावेश असावा.  दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.  जागरण करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.  रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.  डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर थोडावेळ ठेवावेत.  मानसिक ताण घेऊ नये.  चहा...

उन्हाळ्याच्या दिवसात ही थंडपेये व सरबते प्यावीत

Image
  उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे ?  उन्हाळा सुरु झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रीजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंड्पेयाची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतात.  उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये व सरबते :-   कोकम सरबत :-  कोकम सरबत इतर कोणत्याही कृत्रिम कोल्ड्रिंक्सपेक्षा चविष्ट असून याचे आरोग्यासाठीचे फायदे अनेक आहेत. कोकम सरबत पिल्याने पित्ताचे खडे असणे, अंगावर पित्त उटणे, पित्तामुळे डोके दुखणे यासारखे अनेक पित्तविकार दूर होण्यास मदत होते.  कोकममुळे अंगात शीतलता वाढून जळजळ, दाह कमी होतो. लघवीस जळजळट असल्यास किंवा उन्हाळे लागण्याचा त्रास असल्यास कोकम सरबत त्यावर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकम सरबत जरूर प्यावे. या सरबतासाठी लागणारे रातांबे कोकाणाशिवाय मिळत नाही. पण काळजी करू नका कारण, आजकाल ब...

सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे करा घरगुती उपाय -

Image
  सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. सर्दी लवकर जात नाही त्यामुळे या त्रासामुळे वैताग येत असतो, यासाठी खाली सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळ करण्यासाठी घरगुती उपाय दिलेले आहेत. सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय :-   लिंबू रस आणि मध:-  चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण रोज सकाळी प्यावे. यामुळे चोन्द्लेले नाक मोकळ होण्यास मदत होते.  आले :-  आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकतो.   पुदिना :-  गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.   कांदा :-  कांदा घेऊन बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे नाक मोकळे होईल. त्याचप्रमाणे थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून नाक मोकळे होईल.  गरम पाण्याची अंघोळ :-  नाक चोंदणे समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे...

उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या येण्याची कारणे व त्यावरील उपचार

Image
  घामोळे येण्याची कारणे :-   उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या त्वचेवर घामोळे येतात.  उकाड्यामुळे उन्हाळ्यात अधिक घाम येवू लागतो, अशावेळी जर त्वचेवरील घामाच्या ग्रंथीपासून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात. याला घामोळे येणे असे म्हणतात.  तसेच काहीवेळा आलेला घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काल घाम राहिल्यानेही घामोळे येते.  घामोळ्याचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना अधिक होत असतो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा त्रास कोणालाही होऊ शकतो.  घामोळ्यावरील उपचार :-   घामोळे साधारण आठवड्याभरात आपोआप कमी होतात. त्यामुळे शरीरावर घामोळे आल्यास त्याठिकाणी खाजवून जखम करू नये. यासाठी घामोल्याच्या ठिकाणी पावडर वापरू शकता.  यामुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी होते.  घामामुळे होणाऱ्या बॅॅॅॅॅक्टेरियाही कमी होतात.  याशिवाय अधिक त्रास होत असल्यास आपले डॉक्टर, त्वचेवर लावण्यासाठी कॅॅलेमाईन लोशन देऊ शकतात. त्यामुलेझी घामोल्याचा त्रास लवकर कमी होईल.  उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्य...