शरीरातील रक्त वाढविण्यासाठी घरगुती उपाय
तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर त्याचे एक न अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा लागणे, अशक्त पणा जाणवणे यांसारखे काहींच्या त्वचेवर काही परिणाम आढळून येतात, तर काही जणांचे विशेषतः प्रौढांचे हात पाय सुजण्यासारखे परिणाम होतात.या शरीरावरील दुष्परिणामा सोबतच एनिमिया सारखे रोग देखील होऊ शकतात. रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहारा बरोबरच काय खावे व काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे मोड आलेले कडधान्य खाणे - रक्त वाढवणे एक उत्तम उपाय मोड आलेली मटकी, हुलगे, चवली या रोज कडधान्य तुमच्या आहारात असायला हवेत. यामुळे शरीरातील रक्ताचे किंवा हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यास मदत होते. आहारात टोमॅॅटो चा समावेश दिवसेंदिवस आहारात टोमॅॅटो चा समावेश देखील होतो. लवकर रिझल्ट पाहिजे असल्यास टोमॅॅटो चा सूप किंवा ज्यूस रोज प्या. टोमॅॅटोमध्ये व्हिटॅॅमिन सी जे रक्त विकास अत्यंत गुणकारी असते.