मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक घरगुती उपाय | मणक्यातील गॅॅप

           मणका आजारावर घरगुती उपाय पट्टा बसविणे, व्यायाम करणे, लांबचा प्रवास टाळणे, वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न पुर्वक आपण आपल्याकडे असणारी लक्षणे कारणे त्यावर करता येणारी योग्य उपचार पद्धती यासाठी आपल्याला योग्य अशी घरगुती आयुर्वेदिक उपचारासाठी पद्धत अवलंबून वेदना दूर करता याव्यात. मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार 

 *मणक्याच्या आजाराची कारणे :- 

           मणक्याचा आजार उद्धवल्यास सतत वेदनादायक प्रवास होत असतो मुख्य लक्षण म्हणजे मणक्यांची झीज होणे होय. मणक्यांची झीज जास्त होत राहतील तितकी लक्षणे मोठ्या प्रमाणात वाढत राहतात. 

मणक्याच्या आजाराची कारणे :- 

१) व्यायामाची आवड नसेल किंवा व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ मिळत नसेल तसेच तुम्हांला व्यायामाचा कंटाळा, अभाव. 

२) कोणतेही बैठे काम करताना तुम्ही नीट बसत नसताल तर. 

३) तुम्ही मांडी घालून बसला असताल किंवा तुम्हांला खुर्चीत बसायची सवय असेल तर तुम्ही पुढे वाकून बसण्याची सवय असेल तरीही आजार होऊ शकतो. 

४) तुम्ही कामानिमित्त चालताना पाठ सरळ न ठेवता चालत असाल तर. 

५) तुम्ही जर सतत मान वर करून टीव्ही पाहत असाल तर. 

६) तुमच्याकडून अधिक सतत खूप लांब अधिक काळ प्रवास होत असेल आणि तुम्ही खूप लांब अधिक काळ वाहन चालवत असाल तर. 

७) तुमच्याकडे कोणतेही ओझे वाहण्याचे काम करत असाल तरीही तुम्ही कसेही ओझे उचलत असाल तर. 

८) खाण्यापिण्यात होणारे बदल सतत चुकीची सवय लावली तरीही. 

९) तुमच्या शरीरात मालीश करण्याचा अभाव. 

१०) तुम्ही सूर्यस्नान करत नसलात तरीही. 

११) डोक्यावर ओझी वाहण्याचा सतत भार वाहत असतील उदा: हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी-दगड वाहणारे मजूर 

१२) पाण्यापासून सतत धडपड करणाऱ्या वर्षानुवर्षे डोक्यावर हंडे घेऊन चालणाऱ्या स्त्रियांना हा आजार लवकर गाठतो. 

मणक्याच्या आजाराची लक्षणे :- 

१) मान व कंबर यांच्यातील हांडा मध्ये असणारी जी रचना असते त्यांची झीज होत राहते. दोन मणक्यातील असणारी गादीची झीज. 

२) मणक्यात गॅॅप तयार होणे. 

३) मणक्यातील गादी बाजूला सरकली जाणे. दोन मणक्यातील असणारी गादीची झीज होत राहते. 

४) मणक्यातील हाड सरकली जाणे. 

५) मणक्याला सतत मुंग्या येत राहणे. 

६) स्वत:च्या हात-पायाला बधिरता येत राहणे किंवा वाटणे. 

७) सतत चक्कर येत राहणे. 

८) चालताना सतत त्रास होत राहणे. 

९) हाताने जोन्तीही वस्तू उचलत असतांना वेदना होत राहणे. 

१०) पायाने लंगडत चालणे इत्यादी. 

* मणक्याच्या आजाराणे चेतातंतुवर दबाव येत असल्यास तयार होणारी लक्षणे :- 

१) तुम्हाला पाठीचा चौकोन, तसेच खांदा, तुमचा दंडचा सर्वात पुढील भाग, तुमच्या मनगटाचा असणारा भाग तुमचा अंगठा या ठिकाणी तुम्हाला असंख्य ठिकाणी वेदना तयार होताना जाणवत असतील. 

२) तुमच्या शारीरिक शक्ती कमी होताना दिसते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो. 

मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात :-                                          

चक्कर येणे -  मेंदूकडे रक्त कमी पडल्याने कमी पडत असल्यामुळे चक्कर येत असते. कमी किंवा जास्त प्रमाणात लक्षण होत असते. 

मणक्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी काय करावे. :- मणक्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक.

१) RX -RAY 

२) RCT 

३) SCAN 

४) M.R.I 

         मानेचा क्ष किरण फोटो काढता येतो व आजार कसा आहे. त्याचे प्रमाण निश्चित करता येत असते.  

मणक्याच्या आजारावर व्यायाम पाठीचे व पोटाचे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. 

योगासने :- 

१) शलआसन :- मणक्याच्या दुखण्यासाठी शलआसन हा व्यायाम फायदेशीर होतो. 

२) नौकासन :- मणक्याच्या आजारावर नौकासन हा व्यायाम खूपच फायदेशीर आहे. 

३) धनुशासन :- हा मणक्याच्या आजारावर खूपच फायदेशीर व्यायाम आहे. 

४) भुजंगासन :- मणक्याच्या आजारावर भुजंगासन फायदेशीर आहे. 

५) वृक्षासन :- मणक्याच्या आजारावर वृक्षासन हा व्यायाम फायदेशीर आहे. 

* मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय :-

१) व्यायाम :- मणक्याच्या आजारावर पाठीचे व पोटाचे व्यायाम करणे हा सर्वात उत्तम भारीच उपाय आहे. 

२) योगासण :- मणक्याच्या आजारावर योगासन खूप महत्त्वाच आहे. त्यामध्ये शलआसन, नौकासन,                  धनुशासन, भुजंगासन हीयोगासने करणे गरजेच आहे.  

३) तुम्ही बसत असाल तरी देखील तुमचा पाठीचा कणा नेहमीच ताठ ठेवून बसणे गरजेच आहे. 

४) तुम्ही बसलेल असताना तरीदेखील खुर्चीतून तुम्ही दर अर्ध्या-अर्ध्या तासात उठून चक्कर मारणे.

५) पंचकर्मे :- मण्याबस्ती व कटिबस्ती या पंच कर्माने दुखणे कमी होते. 

* मणक्याच्या आजारावरील उपचार पद्धत :- मणक्याचा आजार जर सौम्य किंवा मध्यम असणारा आजार असेल तरी देखील साधे सोपे उपचार उपाय केले तर वेदना कमी होऊन लक्षणे कमी होतात. 

१) आपल्या मानेच्या खाली कमी रुंदी असणारी मऊ अशी उशी घेतली तर यामुळे मानेला विश्रांती मिळते. 

२) शेक देणे :-  मानेला मणक्याला शेक दिल्यास वेदना कमी होतात. 

३) व्यायाम :- मानेचे व्यायाम करून स्नायू बळकट करणे आणि स्नायूबंध / पट्टे ढिले करण्याने वेदना कमी होत जाते. 

४) वेदनाशामक गोळी :- वेदना कमी करायची असल्यास तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या वापराव्यात.  

५) पट्टा वापरावा :- प्रवास करत असाल तर प्रवास पट्टा वापरणे गरजेच असते. मानेला धक्का बसणार नाही. 

६) ताजा आहार :- आपल्या शरीरात योग्य व ताजा आहार घेतला तर योग्य घटक शरीराला मिळून शरीर मजबूत होते. 

* मणक्यातील गॅॅप उपाय :- 

१) दररोज एसी किंवा फॅॅनखाली आराम करू नये तसेच झोप कधीतरी घ्यावी. 

२) तुम्हाला होणाऱ्या वेदना याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दीर्घ श्वास घेत चला. व तो श्वास हळूहळू सोडत चला. 

३) तुमच्या कामातून वेळ काढून ध्यानधारणा करा. 

४) तुमच्या शरीराला तिळाच्या तेलाने दररोज नियमित मालीश केली तर नक्कीच आराम पडेल. 

५) तुम्ही दररोज सूर्यस्नान घेतले तर उत्तम असा फायदा होईल.   







Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स