फक्त गर्भधारणेमुळेच नाही तर 'या' कारणांमुळे देखील अनियमित होऊ शकते मासिक पाळी !


             मासिक पाळीशी निगडीत असणारी प्रत्येक गोष्टी थेट स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे मासिक पाळीबाबत संपूर्ण स्त्रीला माहित असणे अत्यंत गरजेचे असते. कारण जर तुमची मासिक पाळी अनियमित झाली किंवा एखाद वेळी चुकली तर तुम्ही गरोदरच आहात असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. तर त्यामागे असतात ही काही कारणे, जाणून घ्या कोणती! 

               कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी महत्वपूर्ण स्थान घेते. ही मासिक पाळी वेळेत आली आणि वेळेत संपली कि स्त्रीला कोणतही टेन्शन राहता नाही. पण जेव्हा मासिक पाळी येत नाही तेव्हा मात्र ती गोष्ट जास्त चिंतेची असू शकते. आपल्याकडे असा समाज रूढ झाला आहे कि मासिक पाळी ही तेव्हाच थांबते जेव्हा स्त्री गरोदर असते. त्यामुळे जर स्त्रीचा संभोग झाला असेल, पण सारं काही सुरक्षित होऊनही जर मासिक पाळी थांबली तरी सुद्धा आपण गरोदर असल्याची भीती स्त्रीच्या मनात दाटते. 

              पण तुम्हाला माहित हा आहे का मासिक पाळी थांबण्याचं केवळ हेच कारण नसत. अशी अजून अनेक कारणे आहेत जी मासिक पाळी न येण्याला कारणीभूत असू शकतात. आज आम्ही तुम्हाला तीच कारणे सांगणार आहोत, जेणेकरून कधी मासिक पाळी आली नाही तर शांत राहून तुम्ही यापैकी कोणत कारण कारणीभूत आहेत का याचा विचार करू शकता. 

तुम्ही गोळ्या घेत आहात का

जर तुमचं लग्न झालेलं आहे आणि लवकर गरोदर राहू नये म्हणून तुम्ही गोळ्या घेत असाल तर यामुळे सुद्धा मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येऊ शकते. जर तुम्ही एक्सटेंंडेड - सायकल बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन करत असाल तर तेव्हा सुद्धा तुमच्या मासिक पाळीची तारीख वाढू शकते. गर्भधारणा न होण्यासाठी केले जाणारे असे अनेक उपचार आहेत. जर तुम्ही त्यापैकी कोणती पद्धती वापरत असाल तर त्याचा प्रभाव मासिक पाळीवर होतो. 

                 


जर तुम्हाला एखाद्या गोष्टीच जास्त टेन्शन असेल आणि त्याचा ताण तुमच्यावर खूप असेल तर त्याचा शरीरातील हार्मोन्सवर खूप वाईट प्रभाव पडतो. यामुळे दोन मासिक पाळींच्या मध्ये मोठे अंतर पडू शकते. आपल्या मेंदूचा हिस्सा हायपोथेलेमस, आपली मासिक पाळी नियंत्रित करण्याचे काम करतो. तणावामुळे हायपोथेलेमसवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे स्त्रियांचे वजन सुद्धा वेगाने वाढू लागते. त्यामुळे शक्य तितका कमी ताण घ्यावा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मासिक पाळीवर कोणताही प्रभाव होणार नाही. 

PCOD आणि PCOS   

PCOD आणि PCOS अर्थात पाॅॅलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओडी) मधील समस्यांमुळे सुद्धा बऱ्याचदा स्त्रियांना मासिक पाळी न येण्याचा त्रास सतावतो. या काळात अतिरिक्त फाॅॅलिकल्स तयार होत असतात, ज्यामुळे मासिक पाळीची सामान्य प्रक्रिया लांबत जाते. त्यामुळे कधी मासिक पाळी आली तर ती गरोदरपणामुळे आहे असा विचार करून टेन्शन घेऊ नका, कारण त्या शरीरातील काही बदलही कारणीभूत असतात, जसे PCOD आणि PCOS ! 

 मासिक पाळी वेळेत न येण्याचे अजून एक कारण डायबिटीज किंवा थायरॉइडचा आजार असू शकतो. थायरॉइडमुळे मासिक पाळीमधील रक्तस्त्राव अतिशय कमी येतो. त्यामुळे मासिक पाळी असल्याचेही कळत नाही. कधी कधी मात्र हा रक्तस्त्राव अतिशय असतो आणि अनियमित असतो. अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की या आजारांमुळे तुमची मासिक पाळी कित्येक महिने बंद राहू शकते आणि या स्थितीला अमेनोरीया असे म्हणतात. 

तुमचे वय ५० च्या आसपास आहे का

मेनोपॉज एक अशी स्थिती आहे जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येते. या स्थितीत स्त्रियांची मासिक पाळी बंद होते. या कारणामुळे शरीरात वेगाने हार्मोनल बदल होऊ लागतात. सामान्यतः स्त्रियांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त झाल्यावर मेनोपॉजचे लक्षण दिसू लागतात. तर काही स्त्रियांमध्ये त्या आधीपासून मासिक पाळी येणे बंद होऊ लागते. ही सुद्धा एक शारीरिक समस्या असून त्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम! मासिक पाळी थांबणे ही समस्या पहिल्या पासून मेनोपॉज सुरु होणे किंवा प्रीमच्युर ओवेरीयन फेलीयरशी संबंधित असू शकते.

तर ही आहेत काही कारणे ही मासिक पाळी न येण्यामागे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गर्भधारणा झाली असं अविचार करून ताण घेऊ नये आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून उपचार घेऊन काही गंभीर स्थिती असल्यास ती दूर करता येईल. 


  





Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स