केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ

 

  1.  केसांना तेल लावण्यापूर्वी ते किंचित गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावा. 
  2. तेलात बोटंं घालून, हाताने केसांचे भाग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा.
  3. केसांवर तेल थापून ठेवू नका. गरजेपुरते तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा. जास्त तेल म्हणजे ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लागेल. 
  4. तेल लावताना केस तळव्यांंवर घेऊन चोळू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. टाळूवर १०-१५ मिनिटे मसाज करावा, यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. 
  5. रात्रभर केसांवर तेल राहू द्या. जास्त वेळ तेल केसांवर राहणे चांगले असले तरीही २४ तासांपेक्षा अधिक काळ  ठेवू नये. त्यामुळे घाण जमून केस दुबळे होण्याची शक्यता असते. 
  6. गरम टॉवेलने केसांना वाफ देणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे केसांमध्ये तेलाचे योग्यरित्या शोषण होते. मात्र १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉवेल केसांवर ठेवू नये. 
  7. किमान आठवड्यातून एकदा केसांना तेल अवश्य लावावे. 
  8. ज्ञानतंतूचे बल, इच्छापूर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते.
  9. दृष्टी सुधारते, गाल आणि डोळे यांस बलप्राप्ती होते. 
  10. शिरोरोग आणि मज्जारोग यांवर उपयुक्त आहे.
  11. डोक्यावरील केसांची वाढ चांगली होऊन ते लांब, काळे मृदू आणि सशक्त होतात.
  12. मुखाची कांती टवटवीत होते. तेथील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचारोग आणि तारुण्यपिटिका उद्भवत नाहीत.
  13. अकाली केस पिकणे आणि टक्कल पडणे यांस आळा घातला जातो. 
  14. डोकेदुखी होत नाही.
  15. डोक्यामध्ये खवडे होत नाहीत आणि खाज सुटत नाही. 
  16. निद्रा चांगली / शांत लागते.
  17. मुळातच तुमचे केस तेलकट असल्यास, त्यांना पुन्हा तेल लावताना मसाज करणे टाळा.    



Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स