गायीच्या दुधामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या अन्य फायदे


गायीचे दुध डेअरीच्या दुधाच्या तुलनेत शुद्ध आणि पौष्टिक असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतात. 

                 दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीन समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पध्द्तीन वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधरणत: शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दुध किंवा दुध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दुध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दुध पिण अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्वांचा पुरवठा होतो. जाणून घेऊया यासंदर्भातील माहिती. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :- 

आयुर्वेदामध्ये दुधाला अतिशय महत्त्व आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गायीचे दुध पिणे फायदेशीर मानले जाते. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, गायीच्या क्च्च्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे निरोगी सूक्ष्मजीव असतात. 



ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक पेशी मजबूत करण्याचे कार्य करतात. यामुळे आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते. तुम्हाला कच्चे दुध पिणे पसंत नसेल तर तुम्ही उकळलेल्या दुधाचेही सेवन करू शकता. 


केसगळती होते कमी :- 

तुम्ही केसगळतीमुळे हैराण आहात का तर या उपाय म्हणून नियमित गाईचे दुध पिण्यास सुरुवात करा. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्हिटॅॅमिन डी आणि झिंक यांसारख्या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या निर्माण होते. गायीच्या दुधामध्ये व्हिटॅॅमिन डी आणि झिंक हे पोषणतत्त्व  भरपूर प्रमाणात आहेत. या घटकांमुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसगळतीचा त्रास देखील कमी होऊ शकतो.   पण अतिरिक्त प्रमाणात दुध पिणे देखील हानिकारक ठरू शकते. 

डिस्लेक्सिया आजारापासून होतो बचाव :- 

डिस्लेक्सिया आजारामध्ये एकाग्रता कमी होण्याचा त्रास निर्माण होतो. या आजारामध्ये रुग्णाला वाचताना प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण होतात, मोठ-मोठी वाक्य कळण्यास अडचणी येतात. यास एक प्रकारचा मानसिक आजार म्हटलं जाते. गायीच्या दुधातील पोषकतत्त्वांमुळे मानसिक विकार दूर होण्यास मदत मिळते. कारण यातील गुणधर्मांमुळे मेंदूचा विकास होत असतो. मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या शरीराला ओमेगा - ३ फॅॅटी अॅॅसिडची आवश्यकता असते. गायीच्या दुधामध्ये हा घटक मुबलक प्रमाणात असतो. 

हाडे मजबूत होतात :-  

बैठी जीवनशैली, एसी ऑफिस, घरात किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने, व्हिटॅॅमिन डीची कमतरता, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड अशा विविध कारणांमुळे हाडांचे आजार उद्भवू शकतात. हाडे मजबूत राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात कॅॅल्शिअमचा पुरवठा होणे आवश्यक आहे. गायीच्या दुधामध्ये कॅॅल्शिअमचे घटक आहेत. नियमित स्वरुपात तुम्ही गायीचे गायीचे दुध प्यायल्यास हाडे मजबूत होतील. हाडांच्या आजारावर मात करण्यासाठी कॅॅल्शिअम आणि सूर्यकिरणापासून मिळणाऱ्या जीवनसत्त्वाचीही गरज असते. 


मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी :- 

गायीच्या दुधामुळे आपल्या मेंदूच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. नॅॅशनल 'इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ' न देखील या माहितीस दुजोरा दिला आहे. गायीच्या दुधामध्ये असणारे ओमेगा - ३ फॅॅटी अॅॅसिड मेंदूसाठी पोषक असते. या पोषणतत्त्वामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतात. यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. शिवाय मेंदूशी संबंधित कित्येक आजारांपासून संरक्षण होण्यासही मदत मिळत. यासाठी लहान मुलांच्या आहारात गायीच्या दुधाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 


डोळ्यांचे आरोग्य :-  

डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयानुसार ते अधिक संवेदनशील होत जातात. डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी 'व्हिटॅॅमिन ए' ची आवश्यकता असते. कित्येक पौष्टिक खाद्यपदार्थांपासून आपल्या शरीराला 'व्हिटॅॅमिन ए' चा पुरवठा होतो. 'व्हिटॅॅमिन ए' युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे. गायीच्या दुधामध्येही 'व्हिटॅॅमिन ए' मुबलक प्रमाणात आहे. 'व्हिटॅॅमिन ए' मुळे डोळ्यांशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. आपली दृष्टी देखील सुधारते.    








Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स