निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स....
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त आहोत की, आपण आपल्या आरोग्याची मुळीच काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे आपलयाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यास असमर्थ होतो.ज्यामुळे आपल्याला बऱ्याच रोग आणि त्रासांना सामोरे जावे लागते.
निरोगी मन फक्त निरोगी शरीरातच असते...ही म्हण जुनी आहे, पण ती अगदी खरी आहे. तसे, जर आपण आपल्या दैनदिन जीवनात काही गोष्टींंचा समावेश केला आणि काही नियमांचे पालन केले, तर आपण स्वतःस अधिक सहजपणे फिट ठेवू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया.
निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी टिप्स :-
१) खूप पाणी प्या.
कारण जर आपण व्यायाम केला तर हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यासारखे आजार टाळता येतात. व्यायामाने तुमचे व्यक्तिमत्व सुधारते आणि त्याच बरोबर तुमचे आरोग्यही चांगले राहते.
३) तणावापासून दूर राहा.
जर आपण ९ ते ५ नोकरी करत असाल तर, आपल्याला नक्कीच ताणतणावाचा सामना करावा लागत असेल, परंतु कार्यालयात दिवसभर संगणकावर कार्य करावे लागणार असताना. आपण काही वेळेसाठी लहानसा ब्रेक घेणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये आपण गेम खेळू शकतो, बाहेर फिरू शकतो किंवा फळे खाऊ शकतो. दिवसभर एकाच खुर्चीवर बसून काम करू नका हे लक्षात ठेवा. तसेच जास्त ताण घेऊ नये.
४) सकाळचा योग्य नाश्ता घ्या.
सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर असतो दररोज सकाळी तुम्ही न्याहारी करा, पण हेही महत्वाचे आहे की, तुम्ही न्याहारी काय करीत आहात.
त्यामध्ये तुम्ही निरोगी गोष्टीचा समावेश करणे आवश्यक आहे, सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमची न्याहारी झालेली असावी. कारण नंतर आपली जेवणाची वेळ होते.
सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अंड्यांचा, प्रोटीन शेक, दुध, ओमलेट, भिजलेले कडधान्ये, कोंब आलेली मोट,फ्रेश फ्रुट इ. चा समावेश करू शकता.
५) फास्ट फूड खाणे टाळा.
आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर आपल्याला बाहेरचे खाणे आणि फास्ट फूड टाळावा लागेल. कारण ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या शरीरासाठी घटक ठरू शकते, फास्ट फूडमध्ये पिझ्झा, बर्गर, चाउमीन, रोल इत्यादी आपल्याला टाळावे लागेल.
फास्ट फूड दीर्घकाळापर्यंत सेवन केल्यामुळे आपल्या शरीरावरही कर्करोग होऊ शकतो, जर शक्य असेल तर आपण कधीही फास्ट फूड घेऊ नये.
६) फळे किंवा ड्राय फ्रुट्स ( मेवा खाऊ ) खा.
दिवसा आपण प्रत्येक तासाच्या आत काहीतरी खावे. ज्यामध्ये आपण ताजे फळे किवा सुखा मेवा खाऊ शकतो, ड्राय फ्रुट्स मधून नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतींना वास्तविक पाण्याचे प्रमाण काढून टाकले जातात.
ड्राय फ्रुट्समध्ये ताजे फळांपेक्षा पौष्टिक मुल्य जास्त असते. त्यांच्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जे बऱ्याच प्रकारच्या रोगांना नाहीशे करतो, तसेच अनेक जुनाट आजारांपासून आपल्याला दूर करतो.
७) चाला आणि धावा.
आजची नवीन पिढी थोडं अंतरावर बाहेर जायचे असल्यास बाईकचा वापर करतात. ही बाब चुकीची आहे. आपले शरीर निरोगी ठेवायचे असल्यास चालणे किंवा धावणे, यापेक्षा सोप्पा आणि फायदेशीर व्यायाम कुठलाच नाही.
चालण्याने किंवा धावण्याने आपले हृदय जोरात धडधडते. त्यामुळे हृदय रक्त शरीराला वेगाने पोहचवते. म्हणून आपल्या शरीराला सर्व ठिकाणी योग्य रक्त पुरवठा मिळतो.








Comments
Post a Comment