चांगल्या आरोग्यासाठी खजूर खाण्याचे फायदे
खजुराचा आपल्या आहारात समावेश केला तर ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे जाणून घ्या. मिडल ईस्टमध्ये प्रामुख्याने खजुराची झाडे आढळतात पण खजूर मात्र त्याच्या गुणांमुळे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खजुराचे ओले फळ, खजूर आणि खारीक अशा तिन्ही रुपात मिळणारा चवीला गोड असणारा हा पदार्थ काही अपवाद वगळता सगळ्यांचा लाडका असतो. आपल्या आरोग्यासाठी खजूर कसा आणि किती फायदेशीर असतो आणि त्याचे फायदे आपल्याला व्हावेत यासाठी त्याचा आपण आहारात कसा समावेश करू शकतो ते पाहूया. १. खजूर अतिशय पौष्टिक असतो. आपण खातो टो खजूर किंवा खारीक हे वाळवून तयार केलेले असतात. ज्याप्रमाणे सुक्या अंजिरात किंवा मनुकांमध्ये अनुक्रमे अंजीर फळांपेक्षा किंवा द्रक्षांपेक्षा जास्त कॅलरी असतात अगदी त्याच प्रमाणे खजूर किंवा खारकेत सुद्धा कॅलरीचे प्रमाण जास्त असते. २. खजुरात फायबरचे प्रमाण जास्त असते. आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असते. खजुरामध्ये फायबर जास्त प्...