नियमित चालण्याचे मोठे आरोग्यदायी फायदे


          
        मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालण फायदेशीर असते. यामुळे मूडही चांगला राहतो आणि सह्रीरिक उर्जा वाढते. ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणंं हा उत्तम व्यायाम आहे. श्वसनासंबंधीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्याचा व्यायाम करावा. 


चालण्याचे फायदे : 

  • कॅलरीज कमी करण्यासाठी : 
         चालण्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यास उपयोग होतो. भरभर चालण्याने हृद्याच्या ठोक्यांची गती वाढते. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. शिवाय शरीरात उर्जासुद्धा निर्माण होते. पण तुम्ही दिवसभरात जेवढे चालता त्यापेक्षा अधिक पटीने कॅलरीजचे सेवन करत असाल तर त्या व्यायामाचा काहीच फाय होत नाही. त्यामुळे कॅलरीजचे सेवन संतुलीत प्रमाणात झाले पाहिजे. धावणे, स्विमिंग आणि सायकल चालवण्याने जेवढ्या कॅलरीज कमी होतात तेवढ्याच जलद चालण्याने होतात. 

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय ? :
         सध्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चालण्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी प्रमाणात वाढतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज होते. 

  • ताण हलका होण्यास मदत : 
          साधारण तीस मिनिटे चालण्याने मूड चांगला राहण्यास मदत होते. असे अनेक संशोधनांती सिद्ध झाले आहे. यामुळे तान हलका होण्यास मदत होते. नैराश्य सामोरे जाणाऱ्यांना अधिकाधिक चालण्याचा सल्ला दिला जातो. मनावर ताण जाणवत असल्यास किंवा टेंशन आल्यास तुमच्या क्षमतेनुसार वेगाने चाला. 

  • जपा हृदयाचे आरोग्य : 
         हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालणे फायद्याचे असते. परिणामी, शारीरिक आरोग्य जपले जाते. त्यामुळे हृदयरोग असलेल्या रुग्णांना चालण्याचा सल्ला दिला जातो, पण, सारखा दम लागत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चलण्याचा वेग आणि वेळ ठरवावी. जेणेकरून काही अपाय होणार नाही. 

  • ऊर्जेचा स्त्रोत 
         चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते. ऑक्सिजन आणि इतर पोषणमूल्य शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. परिणामी, शारीरिक क्रिया करण्यास उर्जा मिळते आणि मूडही चांगला राहतो. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स