चांगल्या आरोग्यासाठी खजूर खाण्याचे फायदे
१. खजूर अतिशय पौष्टिक असतो.
आपण खातो टो खजूर किंवा खारीक हे वाळवून तयार केलेले असतात. ज्याप्रमाणे सुक्या अंजिरात किंवा मनुकांमध्ये अनुक्रमे अंजीर फळांपेक्षा किंवा द्रक्षांपेक्षा जास्त कॅलरी असतात अगदी त्याच प्रमाणे खजूर किंवा खारकेत सुद्धा कॅलरीचे प्रमाण जास्त असते.
२. खजुरात फायबरचे प्रमाण जास्त असते.
आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असते. खजुरामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळतात म्हणून आपल्या आहारातले फायबर वाढवण्यासाठी खजूराचा जास्तीतजास्त उपयोग केला जाऊ शकतो. फायबरमुळे आपला पचनक्रियेचा वेग कमी होतो आणि जेवल्या जेवल्या रक्तातील साखर वाढत नाही.
३. प्रसूतीसाठी फायदेशीर
गरोदरपणात शेवटच्या काही आठवड्यात खजूर खाल्ल्याने नैसर्गिक रित्या प्रसूती कळा सुरु होतात. खजूरात असणारे कंपाउंडस हे ऑक्सिटोसिनसारखाच परिणाम शरीरावर करतात. खजुरामधल्या कॅलरीजमुळे डिलिव्हरीच्या वेळेस अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही.
४. रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या शरीरात सोडियम, पोटॅॅशिअमचा समतोल असणे गरजेचे आहे. सोडियम हे रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत असते. तर पोटॅॅशिअम कमी करण्यासाठी. खजुरामध्ये असणाऱ्या पोटॅॅशिअम या खनिजामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.
५. त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास उपयुक्त
खजूरात जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटॅॅमिन 'सी' चा परिणाम म्हणजे त्वचेशी सबंधित तक्रारी दूर होतात. तर जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅॅमिन बी ५ मुळे केस गळती कमी होते.
.jpg)
Comments
Post a Comment