संसर्गजन्य आजारांमध्ये काळजी कशी घ्याल ?
गर्दीच्या ठिकाणी आजारी व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्याला संसर्गजन्य आजार अस म्हटल जातं.
पावसाळ्यात साथीचे रोग वाढायला लागतात. साचलेलं पाणी. अस्वच्छता आणि गर्दीच्या ठिकाण यात हे आजार वाढलेले दिसतात. मुख्यतः वातावरणातील तापमान हे विषाणू तसच जीवाणूंच्या वाढीला कारणीभूत असतात. गर्दीच्या ठिकाणी आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्याला संसर्गजन्य आजार अस म्हंटल जात. अंगदुखी, घसादुखी आणि ताप या आजारामध्ये पूर्णतः आराम आणि तापावरचे औषध घ्यावीत. तापाच प्रमाण वाढण किंवा जंतूसंसर्ग जास्त असल्यास प्रतिजैविके वापरली जातात.
साधारण सर्वांमध्ये आढळणारा आजार म्हणजे डासांपासून होणारे आजार. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार, हे आजार साठलेल्या घरातल्या अथवा घराजवळच्या पाण्यातून होणाऱ्या डासांद्वारे होतात. साचलेल्या पाण्यातून डासांची निर्मिती होते. डास चावल्याने त्यामुळे थंडी वाजून येण, ताप येणं, अंग दुखन आणि काही वेळा शरीरातील रक्तातील रक्तपेशी कमी होऊन रक्तदाब कमी-जास्त होण अशी लक्षण दिसून येतात. असे आजार वाढल्यास त्वरित उपचार करण गरजेचं असत.
तिसरा साधारण आजार म्हणजे स्वाइन फ्लू हा अतिशय संसर्गजन्य असणारा आजार आहे. उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरु होतो. अर्थात यावेळी विषाणूंचा संक्रमणकाळ असतो. एच१एन१ च्या विषाणूंच्या वाढीसाठी हा काळ पोषक असतो. त्यादरम्यान विषाणूंचा संसर्ग अथवा त्याची वाढ होण्यास आवश्यक असा काळ असतो. त्यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी खोकण, शिंकण यामुळे त्या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग अन्यत्र पसरतो. या आजारात सर्दी, खोकला, ताप याबरोबर दम लागण, फुफ्फुसात न्युमोनियाचा आजार बळावतो. या आजारात लवकरात लवकर औषधोपचार करावे लागतात. पावसाळ्यात साधारण असणारा आजार आणखी एक आजार म्हणजे जुलाब, उलट्या अस्वच्छ प्रादुर्भाव झालेल्या पाण्यासह अन्नपदार्थामुळे हे आजार होतात. काही वेळा त्यामुळे कावीळही होते.
सगळे आजार बघता आजाराचे मूळ म्हणजे प्रतिकारशक्ती हे आहे. मुळात कामात मग्न होण व शरीराकडे दुर्लक्ष यामुळे संसर्ग लगेच होतो. सर्दी, ताप, खोकला, स्वाइन फ्लू या शिवाय अन्य संसर्गजन्य झालेल्या आजाराच्या रुग्णाने गर्दीच्या ठिकाणी जान टाळाव. आजारी व्यक्तींनी घरी बसन एका खोलीत राहण योग्य आहे अन्यथा हवेमुळे त्यांचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. एकाकडून दुसऱ्या आणि दुसऱ्याकडून अनेकांना असे संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांवर योग्य ती काळजी घेण हाच खबरदारीचा उपाय करणे हेच चांगलं आहे.
.jpg)
Comments
Post a Comment