दात का किडतात, किडू नयेत म्हणून काय घ्याल काळजी
उपाय :- दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून आम्हास विचारण्यात येणारा प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबून असते. दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी अवेळी खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषतः गोड व चिकट पदार्थ साठून राहतात. तोंडातील बॅॅॅॅॅॅॅॅक्टेरियाच्या संपर्कात येवून लॅॅॅॅॅक्टिक अॅसिड नावाचे आम्ल तयार होते. याच आम्लामुळे दाताचा वरचा थर झिजू लागते. दाताला खड्डा पडतो. त्यात पुन्हा अन्नकण अडकतात आणि कडी हळूहळू खोल आतल्या थरापर्यंत पसरत जाते. जर कीड इनॅॅमलपर्यंतच असेल तर सहसा दातास फार त्रास होत नाही. लागलेली कीड योग्यवेळेस स्वच्छ करून त्या जागी दातांच्या रंगाचे सिमेंट भरून दात पूर्ववत करता येतो. यावेळेस उपचार न केल्यास कीड खालच्या थरापर्यंत मन्जे डेंंटीन पर्यंत पोहोचते आणि थंड, गोड, गरम खातांना दात दुखायला लागतो. याही अवस्थेत बरेचदा दातांंमध्ये सिमेंट भरता येते. किडलेल्या दातांची वेळीच काळजी न घेल्यास कीड आतील भागात पसरून दाताच्या मुळापर्यंत पोहोचते. तेथील पातळ हाडाचा छेद करून तेथे गळू तयार होते. यामुळ...