शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय


घामाच्या धारा आणि वाढत्या उष्णतेचा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही घरगुती उपाय केल्याने तुमचा त्रास कमी होईल.
 
  •  आहारात दूध, दही, तुपाच सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करत. ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो. 
  • रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून काशाच्या वाटीन पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनंं होणारी जळजळही कमी होते. 
  • जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानही त्याचा फायदा होतो. 
  • रोज शक्य असेल तर दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून १ चमचा सब्जा अथवा तुळशीच बी घ्यावं. यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर उत्तम. 
  • रोज सकाळी नुसतंं लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरु केल्यानंतर चहा-कॉफी घेण टाळावंं. 
  • फळ, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवण टाळावंं.
  • आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा. आणि तेलकट, तिखट, फस्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅॅसचा त्रास होण्याची शक्यता असते. 
  • पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानही त्रास कमी होतो. 
  • नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी, किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी. 
  • उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण आवश्यक आहेच, मात्र नुसत पाणी पिण्याऐवजी त्यासोबत ग्लूकॉन डी अथवा गूळ किंवा साखर खाल्यान तहान शमते आणि उर्जाही मिळते. पाण्यात वाळा, साळीच्या लाह्या टाकून ते पाणी प्यावं.

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips