मोबाईलचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम


           आज संवादाचे प्रभावी मध्यम म्हणून स्मार्टफोनकडे बघितले जाते. मोबाईल हा जणू आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाईलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचे चित्र पाहायला मिळते. सगळ्याच गोष्टी आता स्मार्टफोन वर 'अपलोड' होऊ लागल्या आहेत त्यामुळे जीवन सहज झाले आहे, परंतु स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक ठरत आहे. या मोबाईलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत.

 

        मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळ्यांचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहे. मोबाईलवर बोलण्याच्या नादात रस्त्याने चालताना होणाऱ्या व ड्रायव्हिंग करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाणदेखील वाढल्याचे आपण पाहत आहोत. इतकेच नाही तर त्यामुळे श्रवण शक्तीवरही गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगतात. मोबाईलमधील तरंगांमुळे कानाच्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम सतत होत असतो. कारण १०० डिग्रीपर्यंत आवाज आपल्या कानात गेल्याने आपले कान बंद होण्याची कशक्यता असते किंवा मग अशा वेळी आपल्याला कमी ऐकू येणे, कानातून वेगवेगळे आवाज ऐकू येणे, कान दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे, सतत आळस येणे असे त्रास होऊ लागतात. सर्वात महत्वाचे म्हणजे कर्कश आवाजामुळे मेनिंगीओमा, ग्लीओमा असे ब्रेन ट्युमरचे आजार उद्भूवू शकतात.

        मोबाईलच्या अतिवापरामुळे कानाप्रमाणे आपल्या डोळ्याचेही वेगवेगळे आजार होऊ शकतात. चष्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठ दुखी, कंबर दुखी, स्थूलपणा येणे यासारखे आजार होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे. उशाला मोबाईल ठेवून झोपल्याने निद्रनाशाचे प्रमाण वाढते आहे. मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा इ. शारीरिक व मानसिक आजार निर्माण होतात. फक्त मानव नाही तर पशुपक्षांवरही याचा वाईट परिणाम होतो. मोबाइल टॉवरच्या किरणोत्सर्गाने चिमण्या, मधमाशा आणि फुलपाखरांसह अन्य सजीव आणि झाडांवरही हानिकारक परिणाम होतात. तेव्हा निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी व्यायाम, आहार यासोबत मोबाईलचा वापरही कमी करणे आज महत्त्वाचे झाले आहे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स