दात का किडतात, किडू नयेत म्हणून काय घ्याल काळजी


 

उपाय :- 

  • दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून आम्हास विचारण्यात येणारा प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबून असते. 
  • दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी अवेळी खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषतः गोड व चिकट पदार्थ साठून राहतात. 
  • तोंडातील बॅॅॅॅॅॅॅॅक्टेरियाच्या संपर्कात येवून लॅॅॅॅॅक्टिक अॅसिड नावाचे आम्ल तयार होते. याच आम्लामुळे दाताचा वरचा थर झिजू लागते. दाताला खड्डा पडतो. त्यात पुन्हा अन्नकण अडकतात आणि कडी हळूहळू खोल आतल्या थरापर्यंत पसरत जाते. जर कीड इनॅॅमलपर्यंतच असेल तर सहसा दातास फार त्रास होत नाही.
     
  • लागलेली कीड योग्यवेळेस स्वच्छ करून त्या जागी दातांच्या रंगाचे सिमेंट भरून दात पूर्ववत करता येतो. यावेळेस उपचार न केल्यास कीड खालच्या थरापर्यंत मन्जे डेंंटीन पर्यंत पोहोचते आणि थंड, गोड, गरम खातांना दात दुखायला लागतो. याही अवस्थेत बरेचदा दातांंमध्ये सिमेंट भरता येते. 
  • किडलेल्या दातांची वेळीच काळजी न घेल्यास कीड आतील भागात पसरून दाताच्या मुळापर्यंत पोहोचते. तेथील पातळ हाडाचा छेद करून तेथे गळू तयार होते. यामुळे दात ठणकतो, सूज येते, कधी हा दात टिचकी मारल्याससुद्धा दुखू लागतो. बरेचदा झोपल्यास किंवा खाली वाकल्यास सुद्धा दात जास्त दुखल्यासारखा वाटतो. 
  • या वेळेस दाताचा क्ष-किरण काढून दाताची आतील रचना तसेच कीड कुठल्या अवस्थेत आहे हे बघितले जाते. नंतर दाताच्या नसेची ट्रिटमेंट करून तो वाचवितो येतो. या ट्रिटमेंटद्वारे दातातील मुळापासूनची कीड काढून त्यात दातांच्या रंगाचे सिमेंट भरून वर सिरॅॅमिकची टोपी बसविली जाते.
     
  • दाट किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी : 
  1. ब्रशिंग व गुळण्या याद्वारे दात स्वच्छ ठेवावे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे. 
  2. खाणे हे सुयोग्य वेळी असावे. गोड पदार्थाचे अतिसेवन टाळावे. सकस आहार घ्यावा. 
  3. दात कोरु नये. डेंटल फ्लाॅस वापरावा. 
  4. कृत्रिम दातांची योग्य काळजी घ्यावी. 
  5. वेडे-वाकडे दात असल्यास अन्नकण अडकून कीड लागू शकते. तेव्हा दात सरळ करण्याची ट्रिटमेंट करून घ्यावी. 
  6. एखादा दात काढलेला असल्यास त्याजागी दुसरा दात न बसवल्यास कालांतराने इतर दात त्याजागी सरकतात व कीड लागणे, हिरड्या सुजणे, असे त्रास उद्भवतात. 
  7. दातांच्या डॉक्टरांंचा नियमित सल्ला घेणे.        

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips