कमी पाणी पिणंं पडू शकत महागात


   

          हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात तहान लागते. कमी प्रमाणात तहान लागली तरीही आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखण फार गरजेचं असत. नाहीतर याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. 

        शरीरामध्ये रक्ताची मात्रासोबतच रक्ताचे पातळ असणे सुद्धा गरजेचे आहे. आणि पाणी रक्त पातळ करण्यास मदत करते. पाण्यामुळे मेंदूतील पेशी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी मदत करत असतात. सोबतच जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पाडण्यासाठी सुद्धा पाणी मदत करते. आपल्या मस्तिष्कच्या कार्यामध्ये अडथला निर्माण करणारे जे काही विषारी द्रव्य घटक पदार्थ असतात. त्यांना बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये असते आणि म्हणूनच आपला मेंदू व्यवस्थित रित्या कार्य करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

         शरीरात रक्त तयार करण्यासाठी तरल पदार्थांची गरज असते. जेव्हा शरीरात तरल पदार्थ कमी होतात तेव्हा रक्ताचं प्रमाणही कमी होत. शरीरात योग्य प्रमाणात ब्लड प्रेशर कायम ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हायपोटेंशन किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो.

          जेव्हा शरीरात पाण्याची लेव्हल कमी होते तेव्हा कोशिका हायपोथॅॅलेमसला संकेत पाठवतात जो वॅॅसोप्रेसिन नावाचंं हार्मोन रिलीज करतो. याला एंंटीडायरेक्टिक हार्मोन असही म्हटल जातंं. किडनी रक्ताचं प्रमुख फिल्टर आहे आणि योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने ती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. शरीरात पाणी झाल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

         पचन तंत्राला योग्य प्रमाणात पाण्याची गरज पडत असते. पाण्याच्या माध्यमातून शरीरातून न पचणारे पदार्थ  बाहेर येतात आणि पचन तंत्र व्यवस्थित राहत. शरीरात पाणी कमी असेल तर याचा प्रभाव थेट आपल्या त्वचेवरही पडतो. पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडते. आणि ओठ कोरडे पडतात. अशा प्रकारचे अनेक परिणाम पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतात. म्हणून आपल्या निरोगी आयुष्यासाठी नेहमी पाणी पीत राहिले पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स