Posts

प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी....

Image
  प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे :-  प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावे.  प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा.  हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुसऱ्या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुसऱ्या नाकपुडिनेही करावे. प्राणायाम करताना कम्फर्टेबल आसनात बसून करावे.  प्राणायाम करताना घाई करू नये. फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किवा त्यांच्या सहाय्याने त्यांच्या समोर करावा.  थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये. प्राणायाम करताना श्वासोच्छवास अत्यंत सावकाश करावा असे पंतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत राहते. प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी.  प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर करावे. 

तंबाखूचे शारीरिक दुष्परिणाम

Image
  तंबाखूचे शारीरिक दुष्परिणाम :-   निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुफ्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो.  रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या त्याच्या परिणामामुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. उदा. बोटे काळी पडून झडणे. निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल, श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो.  श्वसन मार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबध आहे. धुम्रपान करणाऱ्यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे.  गरोदरपणी धुम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात.  तंबाखूच्या धुळीत काम करणाऱ्या कामगारांना सतत तंबाखू-धूळ छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात. एकाच वेळी जास्त तंबाखू-धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ , उलट्या चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळ्याच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठ्या होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो. (अशक्तपणा) व शेवटी मृत्यू येवू शकतो.  खरे तर दारूपेक्षा अध...

व्यसनमुक्ती यावर उपाय..

Image
  व्यसनमुक्ती यावर उपाय पुढीलप्रमाणे आहेत :-  व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असते आणि चिकाटीने प्रयत्न केला तरच त्यात यश येवू शकते. जेव्हा सवय प्राथमिक अवस्थेत असते तेव्हा ती सोडणे सगळ्यात सोपे असते, नंतर ते अवघड होत जाते.  आधी त्या व्यक्तीला वेगळे काढून त्या पदार्थाचा पुरवठा बंद करणे, यासाठी खास संस्था असल्या तर त्यांचा उपयोग करावा. पदार्थ न घेतल्याने जे शारीरिक मानसिक त्रास होतात त्यांवर उपचार करावे लागतात. नाहीतर पदार्थाची ओढ लागणे व अपयश येणे सहज शक्य आहे.  व्यसन थांबल्यानंतर आयुष्यात थोडी पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी मन रिझवतील असे कार्यक्रम लागतात. - उदा. खेळ, गाणी, भजन, इ. शक्यतो हे कार्यक्रम सामुहिक असावेत म्हणजे सगळ्यांबरोबर लवकर प्रगती होते. योगाभ्यासाचा यात चांगला उपयोग होतो.  व्यायाम, अभ्यास, व्यवसाय मार्गदर्शन, इत्यादी इतर जीवनोपयोगी अभ्यासाची व्यसन सुटायला मदत होते.  व्यसन पूर्ण सुटल्यानंतर पुन्हापुन्हा तपासणीसाठी बोलावून लक्ष ठेवणे, तसेच तो पदार्थ परत उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्यावी....

साप चावणे याची लक्षणे व साप चावल्यावर हे उपाय करावे.

Image

मधुमेह घरच्या घरी करता येतो नियंत्रित ; 'हे' आहेत घरगुती उपाय

Image
          मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 

किडनीच आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा! या काही टिप्स मदत करतील.

Image
        ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब , मधुमेह यांसारख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.  Kidney Healthcare Tips :- आपलं मानवी शरीर आणि त्यातील प्रत्येक अवयवाच स्वत:च असं महत्त्व आहे. एक जरी अवयव निखळला किंवा खराब झाला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि तो गंभीर सुद्धा होऊ शकतो. किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी ते पाण्याची पातळी योग्य राहण्यापर्यंत महत्त्वाची काम किडनीद्वारे केली जातत. दर दिवसाला या अवयवाच्या माध्यमातून १८० मिली रक्त फिल्टर केल जात तर ८०० मिली नको असलेले घटक आणि पाणी बाहेर टाकण्यात येत. त्यामुळे किडनीच आरोग्य चांगलं ठेवण फार गरजेच आहे. त्यामुळे किडनीच कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देण गरजेच आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पाच टिप्स वापर करा. 

कोळी चावल्याने त्वचेच होत गंभीर नुकसान, करा हे घरगुती उपाय !

Image
              कोळी हा किटक सर्रासपणे प्रत्येक घरात दिसतो. अनेकांना कोळी चावल्याचा अनुभवही आला असेल. पण कोळी चावणे ही समस्या बाब नाहीये, कारण कोळीच्या चाव्याने त्वचेवर लाल चट्टे पडू शकतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे कोळी चावल्याचे अनेकदा कळती नाही आणि मग त्वचेला झालेली इजा किंवा नुकसान कशामुळे झाल याचा प्रश्न पडतो. पण कोळी चावल्यावर जळजळ होण्यासोबतच त्वचेवर खाजही येते. चेहऱ्यावर जर कोळीने चावा घेतला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इतकच काय तर वेळीच यावर उपचार केले नाही तर याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. त्यामुळे यावर काही घरगुती आणि वेळेत करता येणारे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.