कोळी चावल्याने त्वचेच होत गंभीर नुकसान, करा हे घरगुती उपाय !
कोळी हा किटक सर्रासपणे प्रत्येक घरात दिसतो. अनेकांना कोळी चावल्याचा अनुभवही आला असेल. पण कोळी चावणे ही समस्या बाब नाहीये, कारण कोळीच्या चाव्याने त्वचेवर लाल चट्टे पडू शकतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे कोळी चावल्याचे अनेकदा कळती नाही आणि मग त्वचेला झालेली इजा किंवा नुकसान कशामुळे झाल याचा प्रश्न पडतो. पण कोळी चावल्यावर जळजळ होण्यासोबतच त्वचेवर खाजही येते. चेहऱ्यावर जर कोळीने चावा घेतला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इतकच काय तर वेळीच यावर उपचार केले नाही तर याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. त्यामुळे यावर काही घरगुती आणि वेळेत करता येणारे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बर्फ :- कोळी चावल्यानंतर सर्वात आधी ती जागा स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावी. जर जळजळ जास्त होत असेल किंवा त्वचा लाल होत असेल तर त्यावर बर्फाचा तुकडा ठेवा. १० मिनिटे त्या जागेवर बर्फ लावून ठेवल्यास फायदा होईल.
कोरफड :- कोरफडीमुळे सूज आणि खाज कमी होण्यास मदत मिळते. यात अँँटीफ्लेमेटरी गुण असतात जे सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. याचा फायदा करून घेण्यासाठी कोरफड दिवसात काही वेळा लावा.
लॅॅवेंडर ऑईल :- कोळ्याच्या चाव्यामुळे होणारी सूज आणि वेदना दूर करण्यासाठी लॅॅवेंडर ऑईलचा वापर फायदेशीर ठरतो. याचा वापर करण्यासाठी लॅॅवेंडर ऑईलचे काही थेंड खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करून कोळ्याने चावा घेतलेल्या जागेवर लावा.
अॅॅक्टिवेटिड चारकोल :- चारकोल (एक प्रकारचा कोळसा) विषारी पदार्थ करण्याचे गुण असतात. कोळ्याने चावा घेतलेल्या जागेवर चारकोल पेस्ट लावा. ही पेस्ट १ तासांसाठी तशीच ठेवा. याने त्वचेवर आलेली पुरळ लगेच दूर होईल.






Comments
Post a Comment