साप चावणे याची लक्षणे व साप चावल्यावर हे उपाय करावे.



 
साप चावल्यावर दिसणारी लक्षणे :- 

  • साप चावलेल्या ठिकाणी जखम होणे.
  • सर्पदंशाच्या ठिकाणी लालसरपणा, सूज व वेदना होणे. 
  • उलट्या व मळमळ होणे.
  • अस्पष्ट दिसणे.
  • घाम सुटणे. 
  • आकडी येणे. 
  • श्वास घेण्यास त्रास होणे. 
  • अन्न गिळण्यास त्रास होणे. 
  • पोटात दुखणे, ताप येणे. 
  • शॉक. 
  • हातापायात मुंग्या येणे किंवा बधिरता जाणवणे. 
  • पक्षाघात अशी लक्षणे सापाच्या विविध जातीनुसार जाणवू शकतात. 
साप चावल्यावर काय करावे..? 

जर तुम्हाला चावलेला साप हा विषारी होता की बिनविषारी हे निश्चित करता येत नसल्यास, विषारी साप समजूनच प्राथमिक उपाय करावे. अशावेळी पहिला प्राथमिक उपाय म्हणजे, तत्काळ साप चावलेल्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी किंवा वाहन असल्यास त्यातून व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावे. साप चावल्यावर काय करावे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे. 



साप चावणे आणि त्यावरील उपाय :- 

अनेकदा आपल्या आसपास एकाद्यास साप चावल्याच्या घटना घडत असतात. अशावेळी साप चावल्यास कोणते प्राथमिक उपाय कारावेत, काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास, शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. अशावेळी साप चावल्यावर कोणतेही घरगुती उपाय न करता तत्काळ रुग्णाला दवाखान्यात घेऊन जावे. 

साप चावल्यास हे प्राथमिक उपाय करावे :- 

  • तात्काळ १०८ या नंबर वर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी किंवा जवळपास वाहन असल्यास त्यातून साप चावलेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावे. 
  • रुग्णवाहिका येण्यास वेळ असल्यास साप चावलेल्या व्यक्तीस शांत करावे, त्याला धीर द्यावा. 
  • त्या व्यक्तीला आडवे झोपवावे. 
  • साप चावलेल्या व्यक्तीस जास्त हालचाल करू देऊ नये. कारण त्यामुळे रक्तप्रवाहातून शरीरात लवकर विष पसरत असते. 
  • साबणाच्या पाण्याने साप चावलेल्या ठिकाणी धुवावे. 
  • जंतुनाशक औषध (अँँटीसेप्टिक औषध) जवळ असल्यास जखमेवर लावावे. 
  • साप चावलेल्या ठिकाणच्या थोड्या वरील बाजूस दोरीने आवळपट्टी बांधावी. यामुळे विष सर्व शरीरात पसरण्यापासून रोखले जाते. मात्र आवळपट्टी जास्त घट्ट बंधू नये. ती थोडी सैल बांधावी. 
  • बांधलेली आवळपट्टी १०-१५ मिनिटांनी सोडून १५ सेकंद झाल्यावर पुन्हा बांधावी. 
  • रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. 
साप चावल्यानंतर काय करू नये...?    

        साप चावल्यास काय करावे यापेक्षा साप चावल्यानंतर काय करू नये हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. 

  • सापाला शोधण्यास किंवा साप मारण्यास वेळ घालवू नये. त्यापेक्षा सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा कशी मिळवून देता येईल ते पाहावे. 
  • साप चावलेल्या व्यक्तीस चालत दवाखान्यात नेऊ नये. रुग्णवाहिका किंवा जवळच्या वाहनातून त्याला दवाखान्यात घेऊन जावे. 
  • साप चावलेल्या व्यक्तीस चालत दवाखान्यात नेऊ नये. रुग्णवाहिका किंवा जवळच्या वाहनातून त्याला दवाखान्यात घेऊन जावे. 
  • साप चावलेल्या ठिकाणी तोंडाने रक्त शोषण्याचा प्रयत्न करू नये. 
  • बर्फ किंवा कोल्ड काहीही जखमेवर लावू नये. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणतेही औषध, झाडपाला जखमेवर लावू नये. 
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मांत्रिकाकडे घेऊन जाऊ नये. मंत्रातून सापाचे विष उतरत नाही. अंधश्रध्देच्या नादी लागून रुग्णाचा अमूल्यवेळ वाया घालवू नये. 





 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स