मधुमेह घरच्या घरी करता येतो नियंत्रित ; 'हे' आहेत घरगुती उपाय
मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषध घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षण दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषध वापरण चांगल होईल.
रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातभार लावता येतो. कारलं, काकडी, टोमॅॅटो, सलगम, करवंद, भोपळा, पालक, मेथी, कोबी या भाज्या भरपूर खाव्यात. बटाटे आणि रताळी आहारातून वर्ज्य करावीत. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, संत्री, पपई, पेरू ही फळ खावीत आणि आंबा, केळी, द्राक्षं अशी फळ कमी खावीत. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड, अंजीर भरपूर प्रमाणात खावेत ; मात्र बेदाणे, खजूर खाण टाळाव. मधुमेहाच्या रुग्णांनी साखर, गूळ, उसाचा रस, चॉकलेट अजिबात खाऊ नये.
एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये. भूक लागल्यावरही कमी प्रमाणात खावं. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज अर्धा तास चालण आणि दररोज व्यायाम करण आवश्यक आहे. शक्य असल्यस योगासनं करावीत. दररोज प्राणायम केला पाहिजे आणि तणावापासून शक्य तितकं दूर राहावं, असं आचार्य बाळकृष्ण यांनी म्हंटल आहे.
तुळशीतले अँँटिऑक्सिडटस आणि आवश्यक घटक शरीरात इन्सुलिन साठवून ठेवणाऱ्या आणि सोडणाऱ्या पेशींना योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी तुळशीची २ ते ३ पान खावीत. यामुळे साखर किंवा मधुमेहाची लक्षणे कमी होतील.
बडीशेपही मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. रोज बडीशेप खात असाल त्याचा फायदा होतो. कारल्याचा रसही साखरेच प्रमाण कमी करण्यास मदत करतो. दररोज कारल्याचा रस प्यावा. सकाळी रिकाम्या पोटी टोमॅॅटो, काकडी आणि कारल्याचा रस घेतल्यास फायदा होईल. असंही आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं आहे.
याशिवाय मधुमेहही रुग्णांनी रोज सकाळ-संध्याकाळ ताज्या गव्हाचा, ज्वारीचा अर्धा कप रस आपल्या आहारात घेतल्यास फायदा होईल. जांभळावर काळ मीठ खालून खाल्ल्यानेही रक्तातल्या साखरेच प्रमाण नियंत्रणात राहते. रक्तातल्या साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी महिनाभर रोजच्या आहारात एक ग्रॅॅम दालचिनीचा वापर करा. ग्रीन टीममधलं पॉॉलिफेनॉल आणि त्यातले हायपोग्लायसेमिक घटक साखर कमी करण्यास मदत करतात. शरीर इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास सक्षम होत. कडूनिंबाच्या पानांचा रसही यावर लाभदायी ठरतो. आयुर्वेदानुसार हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

Comments
Post a Comment