तंबाखूचे शारीरिक दुष्परिणाम

 

तंबाखूचे शारीरिक दुष्परिणाम :- 

  1. निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुफ्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो. 
  2. रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या त्याच्या परिणामामुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. उदा. बोटे काळी पडून झडणे. निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल, श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो. 
  3. श्वसन मार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबध आहे. धुम्रपान करणाऱ्यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे. 
  4. गरोदरपणी धुम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात. 
  5. तंबाखूच्या धुळीत काम करणाऱ्या कामगारांना सतत तंबाखू-धूळ छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात. एकाच वेळी जास्त तंबाखू-धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ , उलट्या चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळ्याच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठ्या होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो. (अशक्तपणा) व शेवटी मृत्यू येवू शकतो. 
  6. खरे तर दारूपेक्षा अधिक नुकसान तंबाखू ने होते. कुटुंबाचा रोजचा तंबाखूचा खर्च एकदोन रुपयांपासून वीस-पंचवीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गरीब कुटुंबात हे मोठेच संकट असते. सिगारेटपेक्षा विडी स्वस्त असली तरी विडी जास्त गरीब असल्याने नुकसान होतेच.
  7. धूम्रपानाची सवय सर्वसाधारणपणे विशिआधी किवा विशीमध्ये लागते. बहुतेक वेळा इतरांचे पाहून किवा मित्राचा आग्रह किवा केवळ गंमत म्हणून सुरुवात होते. हळूहळू सवय लागते. धुम्रापानात इतर मादक पदार्थ मिसळून घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. 
  8. धुम्रपान ही एक गलिच्छ व आजारी करणारी सवय आहे हे लहानपणापासून मनावर ठसवले पाहिजे. धूम्रपानाने दात पिवळे पडतात. तोंडाला दुर्गंधी येते. अनेक आजार होतात, पैसे तर जातातच. हे सर्व मुलांच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे.  

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips