किडनीच आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा! या काही टिप्स मदत करतील.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब , मधुमेह यांसारख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
Kidney Healthcare Tips :- आपलं मानवी शरीर आणि त्यातील प्रत्येक अवयवाच स्वत:च असं महत्त्व आहे. एक जरी अवयव निखळला किंवा खराब झाला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि तो गंभीर सुद्धा होऊ शकतो. किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी ते पाण्याची पातळी योग्य राहण्यापर्यंत महत्त्वाची काम किडनीद्वारे केली जातत. दर दिवसाला या अवयवाच्या माध्यमातून १८० मिली रक्त फिल्टर केल जात तर ८०० मिली नको असलेले घटक आणि पाणी बाहेर टाकण्यात येत. त्यामुळे किडनीच आरोग्य चांगलं ठेवण फार गरजेच आहे. त्यामुळे किडनीच कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देण गरजेच आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पाच टिप्स वापर करा.
१)
भरपूर पाणी पिणे :-
२) स्वत:ची नियमित तपासणी करणे :-
अहवालानुसार, भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना ४०-६० टक्के किडनीच्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबियांमध्ये या आजारांचा त्रास असेल तर तुमची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.
३) चांगला आहार घेणे :-
चांगला आणि समतोल आहार म्हणजेच योग्य प्रमाणात व्हिटॅॅमीन्स आणि मिनरल्स मिळाल्याने अवयवांच कार्य उत्तम राहत. कोणत्याही एका खाद्यपदार्थामधून पोषक घटक मिळत नाही त्यामुळे परिपूर्ण आहार घ्या. आहार घेताना देखील योग्य प्रमाणात घ्या. अतिप्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी व्यायाम देखील करा.४) स्वत:औषध घेऊ नका :-
डॉक्टरांच्या सल्ल्याविना पेनकिलर घेण टाळाव. सांधेदुखी आणि सूज येण यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधं घेतल्यास त्याचा किडनीवर परिणाम होतो.
५) धुम्रपान करण सोडा :-धुम्रपाणामुळे रक्तवाहिन्या डॅॅमेज होऊ शकतात ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या ओढवण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब हे किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण मानलं जात, त्यामुळे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं






Comments
Post a Comment