निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स....
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त आहोत की, आपण आपल्या आरोग्याची मुळीच काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे आपलयाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यास असमर्थ होतो.ज्यामुळे आपल्याला बऱ्याच रोग आणि त्रासांना सामोरे जावे लागते. निरोगी मन फक्त निरोगी शरीरातच असते...ही म्हण जुनी आहे, पण ती अगदी खरी आहे. तसे, जर आपण आपल्या दैनदिन जीवनात काही गोष्टींंचा समावेश केला आणि काही नियमांचे पालन केले, तर आपण स्वतःस अधिक सहजपणे फिट ठेवू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी टिप्स :- १) खूप पाणी प्या. एक म्हण आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, ही योग्य म्हण आहे, म्हणून आपण सर्वात आधी या विषयाची सुरुवात पाण्यापासून करू. दिवसातील जास्तीत जास्त पाणी पिणे हे एका फिटनेस माणसाचे सर्वात मोठे रहस्य आहे. कारण दिवसात आपण जे काही काम करतो, त्यात आपण आपली बरीच उर्जा खर्च करतो,पाण्यामुळे काही प्रमाणात आपण ती भरून काढू शकतो, म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला २ ते ३ ग्लास पाणी पिण्या...