डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी कोरफडचे नैसर्गिक उपाय

 



डोक्यातील कोंडा, डोक्याच्या त्वचेला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे केसांचे नुकसान होऊन केस कमजोर होऊन गळायला लागतात. जर डेंड्रफचा वेळेत उपचार केला नाही, तर केस गळण्याची समस्या गंभीर होऊ शकते.

कोंडा होण्याचे कारण, डोक्यात केसांच्या मुळांवर मृत त्वचेचा साठाा आहे. ही मृत त्वचा एखाद्या कवचच्या स्वरुपात साठवून राहते आणि त्याच्यामुळे डोक्याच्या त्वचेला हानी होते. कारण ही डेड स्कीन डोक्याच्या त्वचेपासून निघणाऱ्या तेलात मिसळते आणि मग वळून त्वचेवरून सुटी होऊन खाली पडते. 

डोक्याच्या कोंंड्यापासून अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, जस की कोंड्यामुळे खाज सुटणे, शरीराच्या त्वचेवर पुरळ किवा मुरुम येणे, मानेवर खाज होणे आणि डोळे लाल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

कोरफड (एलोवेरा) जेलचे फायदे, डोक्यातील कोंड्यासाठी उपाय :

एलोवेराचे ताजे जेल डेंड्र्फच्या घरच्या उपायांसाठी एक वरदान आहे (डेंंड्र्फचा घरगुती इलाज). जर आपणाकडे कोरफड (एलोवेरा) ही वनस्पती घरी असल्यास आपण सहजपणे एलोवेराचे ताजे जेल मिळवू शकता. यासाठी कोरफडची पानंं तोडून चमच्याने त्याचा रस काढावा व हाताने मिक्स करून डोक्याच्या त्वचेवर ह रस मसाज करावा. ३० मिनिटे हा रस केसांवर ठेवून मग केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. असं केल्याने केसांना पोषण तर मिळतेच परंतु केसांतील आद्रतेचा अंश देखील नियंत्रणात राहतो.

डोक्याच्या कोंड्यासाठी नैसर्गिक उपचार- एलोव्हेरासह (एलोवेरा) टी ट्री ऑइल : 


कोरफड व टी ट्री ऑइल एकत्र करून केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा हटवण्यासाठी मदत मिळते. जर आपल्या डोक्यातील कोंड्याचा त्रास संपतच नसेल तर कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे लावल्याने डेंंड्र्फच्या समस्येवर हमखास इलाज होतो. टी ट्री ऑइलमध्ये एन्टीबायोटिक गुणधर्म असतात, जे जीवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे मिश्रण त्वचेचे संक्रमण प्रतिबंध देखील करते. कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे.
कडुलिंबाचे तेल व कोरफड यांचा कोंड्यासाठी आयुर्वेदिक उपाय :


आपणाला आधीच माहिती असेल की कडूनिंब आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. कडुलिंबच्या तेलामध्ये एन्टी-बॅक्टेरियल एन्टी-फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची त्वचा संबंंधित संसर्ग टाळता येतात. डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी घरच्या उपचारांमध्ये कडुलिंबाचे तेल फार फायदेशीर आहे. तीन चमचे एलोवेराचे जेल आणि १० ते १५ थेंब कडुलिंबाचे तेल एकत्र करून यांचे मिश्रण तयार करावे. हे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे. केस साफ करण्यासाठी कुठल्याही सौम्य शॅम्पूचा वापर करावा.
दही, ऑलिव्ह ऑइल व कोरफड यांचा कोंड्यासाठी उपाय : 

दही डोक्याच्या त्वचेला मॉइश्चराईझ करते.२-४ टीस्पून एलोवेराचे ताजे जेल किंवा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल (किंवा नारळ तेल) १ कप दही घेऊन मिक्स करावे. हे मिश्रण केसांचे पॅक म्हणून टाळू आणि केसांवर लावा. ते ३० ते ४० मिनिट सोडून द्या आणि मग केस पाणी आणि शैम्पूसह धुवा. ही प्रक्रिया नियमितपणे करा.यामुळे डेंंड्र्फ कमी होईल. 


Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips