कानात बाहेरील कोणतीही वस्तू गेल्यास त्यावरील उपाय
- कानात किडा जाणे :-
- कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर ह किडा काढता येतो. पण तो ताबडतोब काढून टाकणे आवश्यक असते. साधा छोटा चिमटा वापरून किड्याचा भाग पकडून संपूर्ण किडा बाहेर काढता येईल. नंतर कान कोमट पाण्याने धुवून टाकणे चांगले. हे न जमल्यास कंच्या डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे.
- कानात बी किंवा खडा जाणे :-
- बी असल्यास कानात पाणी घालू नये. कारण पाण्याने बी हळूहळू फुगत जाते व ती कानातून काढणे अशक्य होते.
- याउलट न फुगणारा पदार्थ (खडा,पेन्सिल, इ.) असल्यास कानात थोडे पाणी टाकावे. यामुळे तो पदार्थ कानात मोकळा होतो. यानंतर कान जमिनीकडे केल्यावर पदार्थ पडून जातो. न पडल्यास निदान थोडासा बाहेर येतो. यामुळे तो काढणे शक्य असते.
- मुल शांत राहत नसल्यास पदार्थ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. नाही तर नाहक इजा होई.
- वस्तू काढण्यासाठी उपाय :-
- अशी उपकरणे नसतील तर सध्या सेफ्टी पिनचा टोक नसलेला वाटोळा भाग वाकवून घ्या. टोकदार भाग हातात धरून याचा वापर करून आत गेलेल्या पदार्थाच्या मागे नेऊन हळूहळू बाहेर ओढा. याने बहुधा तो पदार्थ बाहेर येतो. मात्र इजा न करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- कानातील वस्तू काढण्याची आणखी एक निर्धोक घरगुती पद्धत म्हणजे नळीच्या साहाय्याने खेचून घेणे. यासाठी साधी रबरी नळी वापरावी.
- कानाच्या आत जाईल इतकी ती लहान तोंडाची असावी. नळीची एक बाजू आपल्या तोंडात धरून दुसरे टोक त्या वस्तूवर लावावे; पण दाबू नये. मुलाचे डोके कोणालातरी पक्के धरून ठेवायला सांगावे. आता आपल्या तोंडातून हवा ओढण्याची क्रिया करावी. यामुळे हवेची पोकळी निर्माण होऊन कानातील वस्तू नळीने बाहेर खेचता येईल. बी असेल तर ती गुळगुळीत असल्याने सहज निघू शकते. या कामासाठी सलाईन सेटच्या नळीचा तुकडा वापरावा.
- शक्यतो अशा कामासाठी तज्ज्ञाकडे पाठवणे बरे. पदार्थ निघाल्यानंतर कान तपासून आत इजा झाली की काय हे पाहावे.


Comments
Post a Comment