ओठांची निगा कशी राखावी

 

  • ओठांचा आखीव, रेखीव आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या मधल्या बाजूला भडक रंग लावला आणि कडांना हलक्या रंगाने लिपस्टिक लावावे.
  • ओठ दाताने कुरतडण्याच्या सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, ओठ राठ दिसतात. यासाठी ग्लाॅॅसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर करता येईल. हे पारदर्शी रंगाचेही असते.
  • सकाळी, रात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईल. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. 
  • चेहरा आणि ओठ अतिशय लहान असल्यास लिपस्टिक ओठांच्या कडांच्या पलीकडे जाऊन थोडी बाहेरपर्यंत लावावी, ओठांवरील लिपस्टिक काढण्यासाठी नेहमी क्लिंंझींग मिल्कचा वापर करावा.
  • लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडीशी पावडर लावावी, त्यानंतर लिपस्टिक लावावी, ह्यामुळे लिपस्टिक बराच वेळ टिकण्यास मदत होईल व ओठ सुंदर दिसतील. 
  • लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर लावून बेस तयार करून नंतर त्यावर लिपस्टिक लावल्यासही लिपस्टिक बराच वेळ टिकून राहते. 
  • शेंगदाण्याच्या तेलाने ओठांवर मसाज करून नंतर सुती कपड्याने पुसून घ्या. ओठ नरम होतील.
  • साखरेच स्क्रबिंग - ओठांवर साखर आणि मध एकत्र करून स्क्रबिंग करावं. हे मिश्रण ओठावर चोळल्यास मृत त्वचा निघून जाते आणि ओठातील ओलावा टिकतो.
  • मधाचंं मॉइश्चरायझिंग-मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे तसेच यामध्ये जंतूरोधक गुणधर्मही आहेत. दिवसातून दोन वेळा ओठांवर मध लावल्यास चिरण्या पडण्याचा त्रास कमी होतो आणि ओठांचंं सौंदर्य राहतंं. 
  • गुलाबाच्या पाकळ्या - सुबक ओठांना गुलाबाच्या पाकळ्यांनी उपमा दिली जाते. आता याच गुलाबाच्या पाकळ्या ओठांच सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात. गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. या पाकळ्यांची पेस्ट करून ओठांवर लावावी आणि १५ मिनिटानंतर गरम पाण्याने ओठ धुवावेत. यामुळे ओठांचंं सौंदर्य वाढतंं. 
  • थंडीत त्वचेच्या शुष्कतेमुळे हा त्रास होतो. अशा परिस्थितीत ओठ फुटण्याचा, त्वचा उलण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. यावेळी ओठांवर भेगा पडतात, शुष्कता वाढते आणि ओठांची जळजळ होते.
  • गरम अथवा तिखट खाताना वेदना जाणवतात. ग्लिसरीन अथवा एखादंं क्रीम लावून तात्पुरता आराम मिळतो. मात्र या त्रासावर काही घरगुती उपाय जास्त परिणामकारक ठरतात. म्हणूनच शुष्कता कमी करून ओलावा टिकवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
  • आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी, महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टिकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे ओठांवर याचा दुष्परिणाम होपून ओठ काळे पडतात. 
  • ओठ फाटलेले आणि सुकलेले असतील तर, आपल्या चेहऱ्याची चमकच निघून जाते. अशा ओठांना कितीही लीप बाम लावला तरी ओठांमध्ये नैसर्गिक चमक दिसत नाही. अशा वेळेस ठोस उपाययोजना करणे गरजेचे असते. 
  • बाजारातील महागड्या लीप स्क्रबरवर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी उत्तम लीप स्क्रबर बनवू शकता. आलं, मध आणि साखर यांचा वापर करून हे लीप स्क्रबर बनवले जाते.
  • साखर आणि मध प्रत्येकी एक चमचा घ्यावे. यात आल्याचा एक तुकडा बारीक कापून टाकावा. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून जेलप्रमाणे नियमित ओठांना लावावे. 
  • हे जेल ओठांना लावल्यावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करावे. यानंतर काही वेळाने ओठ धुवावेत. यामुळे ओठ अधिक मुलायम होऊन चमकदार बनतील. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स