सुदृढ शरीरासाठी आहार...
सुदृढ शरीरासाठी निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार गरजेचा आहे. या टिप्स वाचून तुम्हाला संतुलित आहार कसा घ्यायचा याची कल्पना येईल. आहारातून काब्स पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा चांगले कार्बोहायड्रेट निवडा. काब्स आपल्याला ऊर्जेसाठी अत्यावश्यक आहेत. म्हणूनच रोजच्या आहार प्रक्रिया न केलेली धान्ये सामाविष्ट करा. रोजच्या आहारात प्रथिने घेतलीच पाहिजे. डाळी, कडधान्ये, मासे, पोल्ट्री, नट्स आणि बीन्स हे प्रोटीन्सचे सर्वोत्तम पर्याय आहेत. हेल्दी फॅॅॅॅट्स असलेले पदार्थ निवडा, सॅॅच्युरेटेड फॅॅट जास्त असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि ट्रान्स फॅॅट असलेले पदार्थ टाळा. नट्स आणि मासे हे हेल्दी फॅॅॅॅट्सचे सर्वात आरोग्यदायी स्त्रोत आहेत. आहारात फायबरचा समावेश करा. तृणधान्ये, ताजी फळे व भाज्या असा भरपूर फायबरयुक्त आहार निवडा. भाज्या व फळांतून आपल्याला व्हिटॅॅमिन्स, मिनरल्स आणि अँँटिऑक्सिडंंट्स देखील मिळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. शरीराचे कार्य सुरळीत चालावे व हाडे भक्कम राहावीत यासाठी कॅल्शियम असलेले पदार्थ जसे की दुध, खारीक, नाचणी यांचा आहारात समावे...