निरोगी शरीरासाठी महत्वाची योगासने...
दिवसातून केवळ अर्धा तास योगासने करून तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त आणि लवचिक ठेवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. पुढील योगासने केल्यास तुमचा व्यायाम तर होईलच शिवाय ताणतणाव कमी होण्यास देखील मदत मिळते. पावर योगा केल्याचेही अनेक फायदे आहेत.
सुखासन :
या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायाचे असेल तर या आसनाचा दररोज सराव करा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर मांडी घालून बसा. डोळे बंद करा. मग हातांचे तळवे तुमच्या गुडघ्यावर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. हि प्रक्रिया वारंंवार केल्याने श्वासोच्छवास नियंत्रणात राहील.
ताडासन :ताडासन केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलन विकसित होते. यासोबतच तुम्हाला तुमचे पोस्चर सुधारायचे असेल तर हे आसन तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन संधिवाताच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा. यानंतर पाय जवळ घ्या व हात पूर्णपणे वर करून दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद ठेवा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, हळूहळू श्वास सोडा आणि पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या..
शवासन :निरोगी जीवनशैलीसाठी शवासन खूप फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर झोपा व पाय आणि हात सरळ ठेवा. पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. शरीर सैल सोडा आणि लक्ष श्वासावर केंद्रित करा. किमान १० मिनिटे या स्थितीत राहा. आता हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.





Comments
Post a Comment