निरोगी हृदयासाठी हेल्थ टिप्स....
संतुलित आहार, नियमितपणे व्यायाम करणे व तणावाचे व्यवस्थापन करणे अशा निरोगी जीवनशैलीमुळे हृदय निरोगी राहते. हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
- हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. कोरोनरी हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे.
- सक्रीय जीवनशैलीचा अवलंब करा. सक्रीय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बुस्टर आणि स्ट्रेेस बस्टर आहे. दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम करणे. तुम्हाला जेथे शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा.
- तुमचे वजन व्यवस्थापित करा. जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या, चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार घ्या.
- भरपूर फायबर खा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी दिवसातून किमान ३० ग्रॅम फायबर खा.
- जास्त प्रमाणात सॅॅच्युुरेटेड फॅॅट असलेले पदार्थ खाल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कमी फॅॅट्स असलेले पदार्थ आहारात घ्या.
- आहारात मीठ कमी करा. निरोगी रक्तदाब राखण्यासाठी, जास्त मीठ खाणे टाळा आणि आपल्या स्वयंपाकात कमी मीठ घालण्याचा प्रयत्न करा.
- जर एखाद्या पदार्थामध्ये १.५ ग्रॅम मीठ (किंवा ०.६ ग्रॅॅम सोडियम) प्रति १०० ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर त्यात मीठ जास्त आहे. तो पदार्थ तुम्ही खाऊ नका. प्रौढांंनी दिवसभरात एकूण ६ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे.
- मासे खा. पिलचार्ड्स, साड्रिन आणि सॅॅल्मन यांसारखे मासे हे ओमेगा-३ फॅॅॅॅट्स स्त्रोत आहेत, जे हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
- मद्याचे सेवन मर्यादित ठेवा. कारण अल्कोहोलमध्ये कॅॅलरीज असतात. नियमितपणे जास्त मध्यपान केल्याने तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो.

Comments
Post a Comment