लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश
निरोगी केसांसाठी खाद्यपदार्थ : केसांना खोल पोषण देण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावा. केसांशी सबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. केस गळणे आणि टाळूला खाज सुटणे कोणालाही आवडत नाही. केसांशी सबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी लॉक अनेक मार्ग वापरतात. अशा परिस्थितीत लोक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात, केसांसाठी महागडी उपचार पद्धतीही वापरतात परंतु, त्यांचा प्रभाव केसांवर जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत आरोग्यदायी पदार्थही महत्वाची भूमिका बाजावतात. रोजच्या आहारातच पोषण असलेले पदार्थ समाविष्ट केले तर. केसांच्या वाढीसाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. आरोग्यदायी पदार्थ पोटात गेल्यानेच केसांची मुळे मजबूत होतात त्यामुळे केसही लांब होतात. निरोगी पदार्थ केसांना खोल पोषण देण्याचे काम करतात. लांब आणि निरोगी केसांसाठी तुम्ही विविध आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. लांब केसांसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
अंडी
रोज एका अंड्याचे नियमित सेवन करा. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि बायोटिन असते. हे केस वाढवण्याचे काम करते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी केसांसाठी तुम्ही अंडी खाऊ शकता.पालक
पालकामध्ये लोह, जीवनसत्वे आणि फोलेट असते. हे केसांना खोलवर पोषण देते. हे केस निरोगी ठेवण्याचे काम करते. याचे सेवन केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.सोयाबीन
सोयाबीनचे सेवन केसांसाठी खूप चांगले असते. याच्या नियमित सेवनाने केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होते. तुम्ही सोयाबीनचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही ते तळू शकता किंवा करीमध्ये घालू शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे.वाळलेली फळे आणि बिया
सुका मेवा अनेक प्रकारच्या मिठाईमध्ये वापरला जातो. ते खूप चवदार आणि निरोगी आहेत. त्यात ओमेगा-३ असते. तुम्ही आहारात अक्रोड, बदाम, चिया बिया. भोपळ्याच्या बिया आणि दुधीच्या बियांचा समावेश करू शकता. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी केसांसाठी त्यांचा आहारात नक्कीच समावेश करा.कडधान्य
कडधान्य हे संपूर्ण धान्य मानले जात असून, ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बायोटिन, लोह, झिंक आणि व्हिटॅॅमिन बी असते. त्यामुळे केस मजबूत होतात.



.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment