सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी उपाय....
डोळे हा अत्यंत महत्वाचा परंतु नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी पुढील उपाय आहेत.
- डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगी व संतुलीत आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर किंवा फळे आणि भाज्यांंचा समावेश करा. विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा-३ फॅॅॅटी एसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्याने डोळ्यांना फायदा होतो.
- जास्त वजन किंंवा लट्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटीनोपॅॅथी किंंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा.
- व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
- तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UV-A आणि UV-B दोन्ही रेडिएशन ९९ ते १०० % रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा.
- डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून, काही खेळ खेळताना किंवा जोखमीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे.
- धुम्रपान टाळा. धुम्रपानामुळे मॅॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदू असे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो आणि ऑप्टिक नव्हरचे नुकसान होऊ शकते.
- डोळ्यांचे काही आजार अनुवांशिक असतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणाला डोळ्यांचे विकार असल्यास नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या. डोळ्यांचे आजार व उपचार जाणून घ्या.
- काॅॅॅॅॅॅॅन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास संक्रमण टाळण्यासाठी काॅॅॅॅॅॅॅन्टॅक्ट लॅॅॅॅन्ड घालताना आधी आपले हात स्वच्छ धुवा. तसेच लेन्सना योग्यरित्या कसे स्वच्छ करावे यावरील सूचनांचे अनुसरण करा आणि आवश्यकतेनुसार बदला.
- जर तुम्ही संगणक बराच वेळ बघत असाल तर तुम्ही डोळे मिचकावणे विसरू शकता आणि तुमचे डोळे थकू शकतात. डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी, २०-२०-२० हा नियम वापरून पहा: दर २० मिनिटांनी, २० सेकंदासाठी आपल्या समोर सुमारे २० फूट दूर पहा. डोळ्यांची नजर वाढविण्यासाठी ह उपाय करा.

Comments
Post a Comment