दररोज लागणाऱ्या हेल्थ टिप्स
निरोगी जीवनासाठी दैनंदिन दिनचर्येत काही छोटे मोठे बदल केलेत तर तुम्हाला निरोगी जीवनशैली जगता येऊ शकते.या सोप्या टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा.
- दिवसाची सुरुवात एक ग्लास लिंबू पाण्याने करा. अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात घाला आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्यासाठी हे प्या. लिंबाचा रस तुमच्या शरीरातील आम्लतेची पातळी कमी करतो, ज्यामुळे, फंगल इन्फेक्शन आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या रोगांपासून तुमचे संरक्षण होते.
- दररोज सकाळी व्यायाम करा. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते. दररोज फक्त २० किंवा ३० मिनिटे व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
- दररोज सकाळी चांगला पौष्टिक नाष्टा करा. सकाळच्या न्याहारीत प्रथिने, स्लो-रिलीज कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश करा.
- हायड्रेेटेड रहा. शरीरात निर्जलीकरण झाल्यामुळे त्रास होतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते. दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लासेस पाणी प्या.
- पौष्टिक जेवण करा. दुपारचे जेवण देखील नाश्त्याप्रमाणे संतुलित असले पाहिजे. कधीही जेवण स्किप करू नका. दुपारच्या जेवणाच्या वेळी जास्त फॅॅॅॅट्स टाळा, कारण त्यामुळे सुस्ती येते.
- रात्रीचे जेवण पौष्टिक व हलके ठेवा. रात्रीच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या ह एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांचा अल्कानायझिंग प्रभाव असतो. पालेभाज्यांबरोबरच रात्रीच्या जेवणात प्रोटीनचाही समावेश करा.
- दुपारी आणि संध्याकाळी कॅॅफिन टाळा, कारण त्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास त्रास होईल.
- आराम काढण्यासाठी वेळ काढा. उच्च तणाव पातळीमुळे तुम्हाला नैराश्य आणि उच्च रक्तदाब यासह अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो. तुम्हाला आनंद देणारा छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून दररोज थोडा वेळ तुमच्या छंदाला द्या.

Comments
Post a Comment