लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी फक्त एवढंंच करा.
मुलांमध्ये दात येण्यापूर्वी, त्यांच्या हिरड्या आणि जिभेच्या स्वच्छतेची काळजी काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे बाळाचे दात आणि हिरड्या निरोगी राहतील. मुलाचं संपूर्ण आरोग्य चांगलं करण्यासाठी, त्याच्या दातांची काळजी घ्यावी लागेल. लहान मुलांच्या दातांची योग्य काळजी घेतली नाही तर दातांमध्ये किडे लवकर पडतात. एक ते तीन वर्षे वयोगटातील मुल स्वतःहून दातांची काळजी घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. मुलांचे दात बाहेर आल्यापासून तुम्ही त्यांच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरु केलं पाहिजे. दात काढण्यापूर्वी, त्यांच्या हिरड्या आणि जिभेच्या स्वच्छतेची देखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे.यामुळे बाळाचे दात आणि हिरड्या निरोगी राहतील. त्यांच्यात जंतू, पोकळी नसतील.मुलांचं संपूर्ण आरोग्य चांगलं करण्यासाठी, त्याच्या दातांची काळजी घेण्यासाठी हे उपाय करा.
1) फ्लाॅॅसिंग
जेव्हा मुलाला दोन ते तीन दात असतात, तेव्हाच फ्लाॅॅसिंग सुरु करा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्न निघून जाईल आणि दातांना कीड लागणार नाही.2) हे खायला देऊ नका
लहानपणापासूनच मुलाला ब्रेड, बिस्किटे, नूडल्स, चॉकलेट इत्यादी जास्त खायला देऊ नका. सकस आहार द्या. जास्त चॉकलेट खाल्ल्याने दातांना चिकटते, ज्यामुळे पोकळी वाढते. दात निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅॅमिन डी, सी, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वांनी युक्त खायला द्या.
3) दोनदा ब्रश करा
जेव्हा तुमच्या मुलाला दात यायला सुरु होते, तेव्हा दिवसातून दोनदा ब्रश करा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी. लहान मुलांना नाजूक हिरड्या असतात, म्हणून त्यांच्यासाठी मऊ ब्रीस्टल टूथब्रश खरेदी करा. गोलाकार हालचालीत ब्रश. जीभ स्वच्छ करण्यास विसरू नका. मुलांचं दातांचं आरोग्य चांगलं राहत.
4) रात्री दूध देऊ नका
अनेकदा काही पालक आपल्या बाळाला झोपायला पाठवण्यासाठी दूध देतात. लहान बाळाच्या तोंडात दुधाची बाटली जास्त वेळ ठेवू नका. यामुळे दात जास्त काळ साखरेच्या संपर्कात राहतात, ज्यामुळे दातात पोकळी होण्याची शक्यता वाढते. ८ ते १ वर्षाच्या वयापर्यंत, बाळाला बाटलीपासून दूध सोडवा आणि कपमधून दूध द्यायला सुरु करा.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
Comments
Post a Comment